Pakistan pacer Ihsanullah U-turn : 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तानच्या यजमानपदाखाली होणार आहे. मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी आयसीसीने पूर्ण तयारी केली आहे. क्रिकेट चाहते या स्पर्धेच्या सुरुवातीची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण टीम इंडिया आणि पाकिस्तान संघाने अजून संघाची घोषणा केली नाही. दरम्यान पाकिस्तान संघाच्या खेळाडूने आधी तडकाफडकी राजीनामा दिला आणि काही तासांतच निर्णय माघारी घेतला.
खरंतर, पाकिस्तानी खेळाडू निवृत्तीनंतर पुनरागमन करतो, त्यात काहीच नवीन नाही. शाहिद आफ्रिदी, मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम सारख्या पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंनी हे केले आहे. आता आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे एका खेळाडूने निवृत्तीनंतर काही तासांतच पुनरागमन केले. पाकिस्तानकडून पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळणाऱ्या इहसानुल्लाहने ही कामगिरी केली.
22 वर्षीय इहसानुल्लाहने काही तासांपूर्वीच पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याने निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने सांगितले की त्याने सध्याच्या टेन्शनमध्ये निवृत्तीचा निर्णय घेतला होता.
खरंतर, इहसानुल्लाहची लीगच्या ड्राफ्टमध्ये निवड झाली नव्हती, त्यानंतर त्याने सार्वजनिक बातम्यांशी बोलताना स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्ती घेताना इहसानुल्लाह म्हणाला होता की, तो खूप विचार करून हा निर्णय घेत आहे. आता, 'एआरवाय न्यूज' नुसार, इहसानुल्लाहने पाकिस्तानच्या टी-20 लीगमधून निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. असेही वृत्त आहे की, पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने निवृत्ती मागे घेताना म्हटले आहे की, त्याने भावनिक होऊन हा निर्णय घेतला आहे.
इहसानुल्लाहची पीएसएल कारकीर्द
इहसानुल्लाहने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 14 पीएसएल सामने खेळले आहेत. या सामन्यांमधील 14 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 16.08 च्या सरासरीने 23 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 5/12 होती. इहसानुल्लाहने 2021-22 हंगामात पीएसएलमध्ये पदार्पण केले होते.
हे ही वाचा -