Parbhani Rain: परभणीच्या पालम तालुक्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून पालम तालुक्यातील गळाटी नदीला पूर आला आहे. परिणामी, या भागातील ५ गावांचा संपर्क तुटला आहे. या नदीवर असणारा पूल पाण्याखाली वाहून गेल्याने आज दिवसभर हा रस्ता वाहतूकीसाठी बंद राहणार आहे.
परभणीत पावसाची जोरदार हजेरी
राज्यभर जोरदार पावसाची हजेरी लागत असून बहुतांश भागांना कोसळणाऱ्या पावसाने अनेक भागात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. परभणीमधील पालम तालुक्यात रविवारी रात्रीपासून बेफाम पाऊस झाली. यामुळे पालम ते जांभुळ बेट रस्त्यावर असलेल्या गळाटी नदीला पूर आला आहे.
५ गावांचा संपर्क तुटला
या भागातील फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी या पाच गावाचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत करण्यात आले आहे. या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने वेळेत काम न केल्याने ही स्थिती ओढवली असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तात्पुरता वाहतूक करण्यासाठी सिमेंट नळी टाकून तयार केलेला पुल पाण्याखाली गेल्याने आज दिवसभर हा रस्ता वाहतूक करण्यासाठी बंद राहणार आहे.
नदीच्या पुरात कार गेली वाहून
बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील खामगाव - नांदुरा रोडवरील सुटाळा गावातून जाणारी छोटी नदीला अक्षरश: पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही नदी प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने खळखळायला लागली आहे. दरम्यान या नदीच्या कडेला उभी असलेली एक चार चाकी इन्होवा कार अक्षरशः डोळ्यादेखत नदीच्या पाण्याने वाहून नेलीय.
भिंत कोसळून एकाचा मृत्यू
मागील दोन दिवसात भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. अशात आज दुपारी घराजवळ काम करीत असताना पावसानं जीर्ण झालेली घराची भिंत अचानक इसमाच्या अंगावर कोसळली. या घराच्या मलब्याखाली दबून इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील करांडला या गावात घडली. योगेश देशमुख (३५) असं मृतकाचं नावं आहे.
हेही वाचा: