परभणी : शेतकऱ्यांना (Farmer) डिमांड आणि पिक कर्ज वेळत न दिल्याच्या रागातून भाजपच्या नेत्याने मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्याच्या थेट कानशिलातच लगावल्याची घटना घडली आहे. भाजपचे परभणी (Parbhani) विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांनी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एमडी समोरच बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली. दरम्यान बँकेला 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत होती. या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगण्यात देखील येत होते. पण तरीही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक कर्जाची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे आपण हे कृत्य केल्याचं स्पष्टीकरण आनंद भरोसे यांनी दिलं आहे. 


दरम्यान परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परभणी शाखेमध्ये अनेक गावातील शेतकऱ्यांचे डिमांड आणि पीक कर्ज मंजूर करण्यात आले आहे. पण तीन कर्मचाऱ्यांमुळे या कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही.  याचाच जाब विचारण्यासाठी विधानसभा प्रमुख तथा बँकेचे संचालक आनंद भरोसे यांनी बँकेत जाऊन जाब विचारला. यावेळी त्यांनी शिवीगाळ देखील केल्याचं देखील समोर आलं आहे. यावेळी बँकेचे एमडी कुरुंदकर देखील उपस्थित होते. 


मग शेतकऱ्यांनी कुणाकडे बघायचे?


बँकेच्या कर्मचाऱ्यांची कामामध्ये होणारी दिरंगाई ही नेहमीच त्रासाचा विषय ठरत आल्याचं म्हटलं जातं. तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांना बँकेच्या कामकाजाविषयी फारशी माहिती नसते. त्यामुळे हे शेतकरी पूर्णपणे बँकेच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतात. पण कर्मचाऱ्यांकडूनच कामाला दिरंगाई होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कोणावर अवलंबून राहायचे असा सवाल देखील यावेळी  आनंद भरोसे यांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, .संचालकांनी वारंवार सांगूनही तुम्ही काम करत नाही.  तर शेतकऱ्यांनी कुणाकडे बघायचे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी जरी भरोसे यांनी आक्रमकपणा दाखवला असला तरीही कर्मचाऱ्यांना मारहाण करणं किती योग्य आहे असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय. 


पिक विम्यात घोटाळा


दरम्यान शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या पिकविम्यामध्ये मागील काही दिवसांपासून घोटाळा होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यातच बीड जिल्ह्यातून आणखी एक घोटाळा समोर आल्याची माहिती आली आहे. बीडमधील माजलगावच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या  94 एकर जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून कळंबच्या एका व्यक्तीने पीक विमा भरला आहे. या प्रकरणी आता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, या घटनेने जिल्ह्यात आता खळबळ उडाली असून, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातचं हे प्रकार समोर येत आहे. 


हेही वाचा :


बीड जिल्ह्यात आणखी एक पीक विमा घोटाळा, साखर कारखान्याच्या अकृषी जमिनीवर काढला विमा