Maratha Reservation News: मराठा समाजाला (Maratha Samaj) ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) मिळवायचे असेल तर येत्या काळात संभाजी ब्रिगेडचा (Sambhaji Brigade) मुख्यमंत्री व्हायला हवा त्यासाठी पुढे येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणूक संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन मराठा सेवाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर (Maratha Seva Sangh Purushottam Khedekar) यांनी परभणीत मराठा सेवा संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात (Parbhani News Updates) केले आहे.


 महामानवांची बदनामी करणाऱ्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याची तरतूद करण्याचा ठराव


मराठा सेवा संघाच्या (Maratha Seva Sangh) या अधिवेशनात महामानवांची बदनामी करणाऱ्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याची तरतूद असणारा कायदा तयार व्हावा असा  ठराव ही संमत करण्यात आला. परभणीत (Parbhani News Updates) सुरू असलेल्या मराठा सेवा संघाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशनाचा समारोप आज पार पडला. ज्याला मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर ( Purushottam Khedekar)यांची उपस्थिती होती. येणाऱ्या काळातील ग्रामपंचायत ते लोकसभेत संभाजी ब्रिगेडचे माणसं निवडून द्या, असं आवाहन खेडेकर यांनी यावेळी केलं. जोपर्यंत संभाजी ब्रिगेडचं सरकार महाराष्ट्रात (sambhaji brigade in maharashtra) येत नाही तोवर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. संभाजी ब्रिगेडचे दोन लोकं जरी लोकसभेत गेले तरी आपला आवाज तिथं पोहोचेल, असंही खेडेकर म्हणाले.


संभाजी ब्रिगेडला राजकीय ताकद देण्याचे आवाहन


यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात संभाजी ब्रिगेडला (Sambhaji Brigade) राजकीय ताकद देण्याचे आवाहन उपस्थितांना केले जात ग्रामपंचायत (Gram Panchayat) असो की लोकसभा (Lok Sabha) यात सर्वच निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रतिनिधींना निवडून द्या, म्हणजे तिथं आपला आवाज पोहोचेल. तसेच संभाजी ब्रिगेडचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय आरक्षण मिळणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतीचं वास्तव आणि दशा या विषयावर देखील उपस्थितांना मार्गदर्शन केलं. 


महामानवांची बदनामी करणार्‍यांविरोधात राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याची तरतूद असणारा कायदा करण्यात यावा यासह एकूण 10 ठराव या महाअधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आले. या अधिवेशनाला मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती. 


ही बातमी देखील वाचा