Maharashtra Weather : राज्यातील विविध जिल्ह्यात तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच घसरला आहे. कमाल तापमानात घट झाल्यामुळं हुहहुडी चांगलीच वाढली (cold Weather) आहे. मुंबईत (Mumbai) यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. कुलाब्यात यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच किमान तापमान 20 अंशाच्याखाली गेलं आहे. याचबरोबर मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे.


धुळे शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी, पारा 8.4 वर 


धुळे जिल्ह्यातही तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळं तिथे कडाक्याची थंडी पडली आहे. धुळे शहरासह जिल्ह्याचे 10 अंशापर्यंत आलेलं तापमान आज 8.4 वर आलं आहे. त्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.   वाढत्या कडाक्याच्या थंडीमुळं सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. रात्रीच्या वेळी देखील रस्ते निर्मनुष्य होत आहेत. ही थंडी मात्र रब्बी हंगामातील पिकांसाठी चांगली आहे. वाढती थंडी पिकांच्या वाढीसाठी पोषक आहे. यामुळं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिक उबदार कपडे आणि शेकोटीचा आधार घेत आहेत.


परभणीतही पारा घसरला


परभणी जिल्ह्यातही कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. गेल्या आठवड्यात गायब झालेल्या थंडीचे  पुनरागमन झालं आहे. गेल्या चार दिवसांपासून परभणीत थंडीचा कडाका कायम आहे. सलग तीन दिवस परभणीचे  तापमान हे 10 अंशावर होते. तर आज हे तापमान 11 अंशावर गेलं आहे. त्यामुळं जिल्हाभरात चांगलीच थंडी पडत असून हवेत कमालीचा गारवा निर्माण झालाय. या थंडीमुळं ग्रामीण भागासह शहरात शेकोट्या पेटत असून नागरिक।उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत.


मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद


दरम्यान, मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. कुलाब्यात देखील यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच किमान तापमान 20 अंशाखाली गेलं आहे. उद्या देखील मुंबईतील किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केला आहे. ख्रिसमसनंतर म्हणजे 25 डिसेंबरनंतर मुंबईत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. मराठवाड्यात किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. तिथे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवल्याचं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडं पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यातही तापमानात घट झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather : पारा घसरला, गारठा वाढला; नाताळानंतर मुंबईसह राज्यात थंडी आणखी वाढणार