परभणी : सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांच्या मागण्या मान्य करा, सोमनाथच्या मारेकऱ्यांना सरकारने पाठीशी घालू नये अन्यथा रस्त्यावरचे आंदोलन उभे करू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. परभणीमध्ये संविधानाची विटंबना झालेल्या जागेला आणि धरणे आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणाला मनोज जरांगेंनी भेट दिली. तसेच सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांचीही जरांगे यांनी भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी सरकारला हा इशारा दिला.  


आरोपी पोलिसांना गृहमंत्र्यांनी पाठीशी घालू नये


मनोज जरांगे म्हणाले की, "मी इथ भाषण करायला आलो नाही. मी गरिबीतून आलो आहे त्यामुळे गरिबीची जाण आहे. सोमनाथ भैय्याबाबत ऐकले. पोलिसांनी त्याला जाणून बुजून मारहाण केली. एका आकसपोटी ती मारहाण ती मारहाण केली. पोलिस एवढी मारहाण करत असतील तर गृहमंत्र्यांनी पोलिसांना पाठीशी घालू नये."


नाहीतर रस्त्यावरची लढाई लढू


सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला नाही तर मराठेही आंदोलन उभं करतील. सूर्यवंशी कुटुंबीयांच्या मागण्या मान्य कराव्यात, आरोपींवर कारवाई करावी. अन्यथा त्यांच्या कुटुंबीयांसोबत आपण उभं राहू असं मनोज जरांगे म्हणाले. सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मी तुमच्या सोबत आहे. न्याय नाही मिळाला तर रस्त्यावरची लढाई काय असते ते दाखवून देऊ असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.  


राहुल गांधींचा पोलिसांवर आरोप


बीड आणि परभणीतल्या घटनांनी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र अशांत झालाय. दोन्ही ठिकाणी राजकीय भेटीगाठी वाढलेल्या असतानाच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी परभणीला भेट दिली. कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केलं. तसंच सूर्यवंशींच्या अंतयात्रेत हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालेल्या विजय वाकोडे, यांच्या कुटुंबियांशीही त्यांनी संवाद साधला.
 
केवळ दलित असल्यानंच सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. एवढंच नव्हे तर या घटनेसाठी त्यांनी संघाच्या विचारधारेला जबाबदार धरलंय आणि सूर्यवंशींच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री खोटं बोलल्याचा आरोपही त्यांनी केला.


ही बातमी वाचा: