Manoj Jarange at Parbhani : परभणी : सोयरे हा शब्द सरकारनंच लिहिलाय, सगे सोयरे या शब्दांमुळे सर्व काही अडकलं आहे, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले. तसेच, आम्ही कुठेही जाहीर केलं नाही, मुंबईत (Mumbai News) जाणार म्हणून त्यांनाच वाटतंय की, आम्ही मुंबईला यावं, असं जरांगे म्हणाले. तसेच, मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळणारचं, असा दावा पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी केला आहे. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही, असंही जरांगे म्हणाले आहेत. 


मनोज जरांगे बोलताना म्हणाले की, "आरक्षणाचा विषय कायद्याच्या चौकटीत कसा बसायचा हे त्यांनी बघायला हवं, त्यातल्या दोन शब्द मुख्यमंत्र्यांनी पटलावर घेतले नाही. तो कागदही त्यांच्याकडे आहे, आम्हाला टाईम बॉण्डबाबत नाही बोललं तर बरं होईल, शब्द त्यांच्याच मंत्रीमंडळानं दिला, तोच त्यांनी पाळावा, ज्यांची 1967 च्या आधीची नोंद मिळाली, त्याच्या सर्व नातेवाईकांना प्रमाणपत्र दिलं पाहिजे." 


"सगे सोयरे या शब्दांमुळे सर्व काही अडकलं आहे. सरकारला 24 डिसेंबरचा वेळ आहे. त्यांनी सांगितलं, मी जरांगे पाटलांना बोलणार नाही, तर मी पण नाही बोलणार. मराठा समाज कधीही एवढा प्रमाणात एकत्र आला नव्हता, आता तो आलाय. हेच सरकारला खुपतंय. याआधी तुम्ही नोटिसा आदी देऊन प्रयत्न केला, मात्र तो आता होऊ देणार नाही. हे दोन पार्ट आहेत. हा मुद्दाच वेगळा आहे. आईच्या मुलालाच जर त्याचा लाभ मिळत नसेल तर किती मोठी शोकांतिका आहे. एका शब्दावर 4 तास चर्चा झाली. त्यांनी लिहिलेल्या 4 ही शब्दावर आक्षेप."


आम्ही कुठेच जाहीर केलं नाही, मुंबईत जाणार : मनोज जरांगे 


"सगे सोयरेच नाही चारही शब्दवर आम्ही ठाम. आधी 144 की आधी आंदोलन, ते मला माहिती नाही. आम्ही कुठेही जाहीर केलं नाही, मुंबईत जाणार म्हणून त्यांनाच वाटतंय की, आम्ही मुंबईला यावं. आमच्या आरक्षणाच्या वेळीच बरा कोरोना आलाय. त्यांनी नोटीसीच्या भानगडीत पडू नये, ते(बचू कडू) शब्द लिहायला होते. त्यांच्याकडून आम्हालाही अपेक्षा नाही.", असं मनोज जरांगे म्हणाले. 


सरकारनं 2024 पूर्वी आंतरवाली अन् राज्यातील गुन्हे मागे घ्यावेत : मनोज जरांगे 


"आंदोलन हाच पर्याय आमच्या समोर आहे, फक्त मराठा आरक्षण, मराठा आमदारांना काय वाटतंय? हे बोलणार नाही. मात्र तुमच्या मुलांचा प्रश्न आहे, त्यासाठी तुम्ही आपले म्हणून मराठा समाजाच्या मागे उभं राहावं. सगळ्या पक्षातल्या मराठा आमदार मंत्र्यांनी उभं राहावं. सरकारनं सांगितलं होतं की, आंतरवाली आणि राज्यातले गुन्हे मागे घेणार, 24 च्या आत ते मागे घ्यावे, नाहीतर मराठा समाजाला वाटेल यांनी आम्हाला फसवलं. 


देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही : मनोज जरांगे 


"54 लाख नोंदी हा अधिकृत आकडा आहे. आम्हालाही सांगणारे आहेत, त्यांच्यातल्याच लोकांना वाटतं की, आंदोलन सुरू रहावं. 54 लाख नोंदी हा पुरावा. मी त्यांना सांगितलं होतं की, अधिवेशनाचा वेळ वाढवा मात्र तसं नाही केलं, अन् नोटिसा देण्याचं काम करत आहेत. एक प्रयोग केला त्यानं काय झालं? हे त्यानं पाहिलं. आता पुन्हा दुसरा प्रयत्न करू नये, देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही."