Maharashtra Border Dispute: महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 48 गावातील नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नावरुन कर्नाटकमध्ये जातो, असा इशारा दिला होता. तेव्हापासून इतर सीमाभागातील गावांकडूनही महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला जात आहे. हे प्रकरण केवळ सांगली-सोलापूर इथपर्यंतचं मर्यादीत राहिलं नाही तर नांदेड, नाशिक आणि विदर्भापर्यंत पोहचले आहे. विकासाच्या मुद्द्यावर गावातील नागरिकांनी महाराष्ट्र सोडून तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे. राज्यात यावरुन गदारोळ सुरु आहे. विरोधकांकडून यावरुन सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले जात आहे. यावर केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड (Dr Bhagwat Kishanrao Karad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक, तेलंगणा सीमेवरील गावांचा वाद केंद्र स्तरावर मिटणार असल्याचं खासदार कराड यांनी सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेली सर्व वक्तव्ये वैयक्तिक आहेत, भाजपकडून नेहमी शिवाजी महाराजांचा सन्मान होतो, असेही यावेळी कराड म्हणाले. ते परभणीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सीमावादावर बोलताना राज्यमंत्री कराड म्हणाले की, कर्नाटक आणि तेलंगणा सीमेवरील गावांचा सुरू असलेल्या वादावर वरील लेवलवर चर्चा चालू आहे. हा वाद केंद्र स्तरावरच मिटेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेली वक्तव्ये ही प्रत्येकाची वैयक्तिक वक्तव्य आहेत. भाजप नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करते त्यांचा सन्मानच करते. सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केलाच पाहिजे, मात्र हा यावरही केंद्रातील आमचे जेष्ठ नेते निर्णय घेतील अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी परभणीत दिली आहे..
परभणी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून केंदीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड आज परभणीत होते. त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. शिवसेना आणि त्यांचे नेते परभणी जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले आहेत. आम्ही येत्या काळात जिल्ह्यातील प्रश्न घेऊन ते सोडवत लोकसभा निवडणूक जिंकणार असल्याचे सांगितलं. त्याचप्रमाणे सीमावाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरूनही केंद्र स्तरावर चर्चा सुरू आहे. तो वाद त्याच ठिकाणी मिटेल, अशी ही माहिती त्यांनी यावेळी दिली.
ही बातमी वाचायला विसरु नका-