Girish Mahajan : कबड्डी (Kabaddi) हा ताकदीचा आणि स्कीलचा मैदानी खेळ आहे. मी कबड्डी खेळत असल्यामुळं इतक्या वेळेला आमदार झालो असल्याचे वक्तव्य राज्याचे क्रिडामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं. या खेळात कोणाची टांग कशी ओढायची, कोणाची कॅच कशी करायची, समोरच्याला कसं टिपायचं आणि एखादा खेळाडू एकतच नसेल तर त्याला ग्राऊंडच्या बाहेर कसं पुश करायचे हे या खेळात मी शिकलो असल्याचे महाजन म्हणाले. राजकारणातही मी तेच केलं, कोणाची टांग कशी खेचायची, कोणाला कसा बाद करायचा, कोणाला कसं पाडायचं हे मी या खेळातून शिकल्याचे महाजन म्हणाले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये 49 व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे गिरीश महाजन यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
 
खेळात असेल किंवा राजकारणात असेल सगळं स्कील सारखंच असते असे महाजन म्हणाले. कबड्डी हा ताकदीचा तसेच स्कीलचा खेळ आहे. मी कबड्डी खेळत असल्यामुळं इतक्या वेळेला आमदार झालो आहे. या खेळाचा मला राजकारणात फायदा होत असल्याचे महाजन म्हणाले. कारण राजकारणात कोणाल कसं बाद करायचं आणि कोणाला कसं पाडायचं हे मी कबड्डीतूनचं शिकलो असल्याचे महाजन यांनी सांगितले. कबड्डी या अस्सल मराठमोळ्या ग्रामीण खेळाचा विकास आणि प्रसार व्हावा, नवोदित, उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाखेडमध्ये 49 व्या कुमार कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली.  यावेळी मंत्री गिरीश महाजनांनी कब्बडीमुळं मी कसा आमदार झालो याचा किस्सा सांगितला. तसेच राजकारणात  कबड्डीचा त्यांना कसा फायदा होतो हे त्यांनी सांगितलं.


विविध जिल्ह्याचे 50 कबड्डी संघ स्पर्धेत सहभागी


परभणीच्या गंगाखेड येथील दिवंगत माणिकराव गुट्टे क्रीडानगरीत लाल मातीची सहान मैदान तयार करण्यात आली आहेत. त्यावर दुपारी चार ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कबड्डीचे सामने प्रकाशझोतात सुरू आहेत. राज्यभरातील 25 मुलांचे आणि 25 मुलींचे असे एकूण 50 विविध जिल्ह्याचे कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी अतिशय रंगतदार सामने इथे पाहायला मिळाले. स्वतः क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर बराच वेळ या सामन्यांचा आनंद घेतला.


महत्त्वाच्या बातम्या:


Girish Mahajan On Eknath Khadse: नोटाबंदीच्या काळात तुम्ही काय केलं ते सर्व मला माहीत आहे; गिरीश महाजनांचा खडसेंना इशारा