Pandharpur News : विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Pandharpur Vitthal Mandir) जिर्णोद्धारा संदर्भातली अत्यंत महत्त्वाची होणारी आजची बैठक काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आली आहे. आता पुढची तारीख आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती व मंदिर समितीची बैठक होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आता केवळ मंदिर समितीची नियमित बैठक होणार असून आजच्या बैठकीत गाभाऱ्याला पॉलिश (Pandharpur Development Plan) करायचा आणि त्यासाठी दर्शन वेळ बदलण्याचा विषय होणार नाही, असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, केवळ एक किंवा दोन दिवस विठ्ठलाच्या दर्शनात बदल करावा लागणार आहे. तसेच मंदिर बंद ठेवण्याची शक्यता प्रशासनाने फेटाळली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आजच्या बैठकीत मंदिर समिती निर्णय घेणार असल्याचे ही सांगितलं जातंय.
पहिल्या टप्प्यातील 73 कोटीच्या संवर्धनाचे काम रेंगाळलं
विठ्ठल मंदिर संवर्धन कामासाठी आज(11 मार्च) जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक घेण्यात येणार होती. विठुरायाच्या गाभाऱ्यातील दगडांना पॉलिश करण्यासाठी दर्शन वेळेत बदल करण्याचे निर्णय आज होण्याची शक्यताही वर्तवली जात होती. याशिवाय मंदिर संवर्धनाचे काम रेंगाळल्या प्रकरणीही आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे सांगितलं जात होतं. मात्र आजची बैठक काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आली असल्याची माहिती आता पुढे आली आहे.
सध्या मंदिर परिसरात भारतीय पुरातत्त्व विभागाकडून मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू असून यासाठी 24 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यातील 73 कोटीच्या या संवर्धनाचे काम रेंगाळल्याने मंदिर प्रशासन आणि समिती आज आक्रमक भूमिका मांडणार असल्याचे ही चर्चा होती. मात्र आता पुढची तारीख आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती व मंदिर समितीची बैठक होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
नव्या जोडप्यांना थेट दर्शन
राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदांपत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असते. मात्र विठुरायाच्या दर्शन रांगेत या नवदांपत्याला तासंतास तिष्ठत उभे राहावे लागते. आता या नवीन जोडप्याला विठुरायाच्या दर्शनाला थांबावे लागणार नसून या नवदांपत्याला त्याच्यासोबत आलेल्या तीन लोकांसह थेट दर्शन दिले जाणार असल्याचा निर्णय मंदिर समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या