Virar Crime News : विरारमध्ये (Virar) किरकोळ कारणावरुन एका परप्रांतीय व्यक्तीने आई आणि मुलीला बेदम मराहाण केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण मारहाणीची (beat) घटना  CCTV कॅमेऱ्यात  कैद झाली आहे. काल 27 नोव्हेंबर बुधवारी रात्री 9:45 वाजता विरार पूर्वेच्या विवा जहागीड कॉम्प्लेक्स तुलशीधाम सोसायटीतील तिसऱ्या माळ्यावर रुम नंबर 302 समोर ही घटना घडली आहे.


खिळा ठोकण्याच्या कारणावरुन मारहाण


मिळालेल्या माहितीनुसार, cctv मध्ये तर एक पुरुष अर्धनग्न दिसत आहे आणि तो महिलेचे केस पकडून तिला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. महिला व पुरुष एकाच इमारतीत शेजारी राहणारे असून दरवाज्यावरील खिळा ठोकण्याच्या कारणावरुन ही मारहाण झाली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गौतम पांडे,आणि त्याची पत्नी प्रतिभा पांडे,असे गुन्हा दाखल झालेल्या पती पत्नीचे नावे आहे. रीना धुरी आणी निशा धुरी असे मारहाण झालेल्या आई आणी मुलीचे नाव आहे.


विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


या बाबत विरार पोलीस ठाण्यात कलम 74,115,(2),, 352,351(2) असा महिलेला मारहाण करून विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. विरार पोलिसांनी पती पत्नीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, या परप्रांतीय व्यक्तिने आई आणि तिच्या मुलीला मारहाण केलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये स्पष्ट मारहाण केल्याचे दिलसत आहे. मारहाण करताना मुलगी खाली देखील पडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. दरम्यान, या घटनेनंतर तुलशीधाम सोसायटीतील सर्व नागरिक एकत्र जमा झाले होते. त्यांच्या मध्यस्थीने वाज सोडण्यात आला. मात्र, मारहाणीच्या घटनेनंतर आई आणि मुलीनं पोलीसातून संबंधीच मारहाणीप्रकरणी परप्रांतीय व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर या परिसरात मोठ्या प्रमाणात परप्रांतिय लोक राहतात. सातत्यानं या लोकांच्या संदर्भात काही ना काही घटना घडत असताना दिसत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेने परप्रांतिय लोकांच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले होते. याच मुद्यावरुन मनसेने अनेकदा आंदोलने देखील केली होती. परप्रांतिय लोकांवर आपला सर्वाधिक खर्च होतो, आपल्या राज्यातील मुलांना नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत, अशी भूमिका अनेकवेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतल्याचे पाहायला मिळाले होते. 


महत्वाच्या बातम्या:


अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय तरुणाचा अतिप्रसंगाचा प्रयत्न; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना