विरार : विरारमध्ये (Virar News) डॉक्टरच्या निष्काजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत चिमुरड्याच्या पालकांनी केली आहे. ताप आल्याने या दोन वर्षाच्या लहानग्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, चुकीच्या औषधोपचारामुळे बाळ दगावला असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
विरार पूर्व मनवेलपाडा तलावा शेजारी ((Manvel Pada) Lake Virar East) असलेल्या यशोदा चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये रविवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे. श्रीवेद विजय रिंगे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या लहानग्याचे नाव आहे. त्याला ताप आल्याने या हॉस्पिटलमध्ये त्याच्या वडिलांनी त्याला दाखल केले होते. उपचारादरम्यान लहानगा हात हलवत असल्याने, नर्सने बाळाला झोपेचे औषध दिल्याचा वडिलांनी आरोप केला आहे. त्या औषधा नंतर बाळाची तब्येत बिघडल्याच सांगितलं आहे.
श्रीवेद या दोन वर्षाच्या मुलाच्या अचानक जाण्याने संपूर्ण रिंगे कुटुंबावर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या आधी देखील यशोदा चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सच्या निष्काळजीपणामुळे निष्पापांचे बळी गेले असल्याचा आरोप झाले आहेत. वारंवार या हॉस्पिटमध्ये रुग्ण्याच्या आरोग्याचा खेळ सुरू आहे. तरी देखील वसई विरार महापालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग गप्प का आहे? असा सवाल विचारण्यात येत आहे. या घटने संबंधी डॉक्टरांशी संपर्क केला असता, त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. संबंधित मॅनेजमेंट आणि डॉक्टरांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून पोलीस आणि पालिका प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी वडिलांनी केली आहे.
आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या बालकाचा अपघाती मृत्यू
शहा कुटुंब हे शनिवार 25 नोव्हेंबर रोजी जिग्ना शाह यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर पडलं होतं. भाईंदर पश्चिमेच्या गोराई समुद्रकिनार्यावरील रिसॉर्टमध्ये सहकुटुंब वाढदिवस साजरा करण्याचे त्यांनी ठरवलं होतं. भाईंदरवरुन गोराई जवळ असल्याने त्यांनी दुचाकीवरुन जाण्याचे ठरवलं. त्यानुसार संध्याकाळी 4 वाजता कुणाल शहा यांच्या दुचाकीवर हे चौघेजण निघाले होते. कुणाल शाह हे गाडी चालवत होते. 5 वर्षांची कियरा पुढे होती तर 11 महिन्यांचा दक्ष हा आईच्या मांडीवर बसला होता. ते उत्तन रोड येथील सुरभी हॉटेलजवळून जात असताना, रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे त्यांची दुचाकी घसरली. त्यामुळे जिग्ना यांच्या हातून दक्ष खाली पडला. त्याच्या डोक्याला जोरात मार लागल्याने त्याला दुखापत झाली. दरम्यान डोक्याला मार लागल्याने चिमुकल्या दक्षचा मृत्यू झाला.