Gujrat Boat in Pakistan Coustody : खोल समुद्रात मासेमारी करताना भरकटलेल्या दोन बोटींना पाकिस्ताननं (Pakistan) ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या बोटीवरील एकूण 16 जण सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. यामधील 7 जण पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. पालघरमधील मच्छिमार संघटनेनं (Fishermen's Association in Palghar) यासंदर्भात माहिती दिली आहे. या सर्वांना पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीनं (Pakistan Maritime Security Agency) ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही पालघरमधील मच्छिमार संघटनेनं दिली आहे. 


पालघर (Palghar News) जिल्ह्यातील खलाशी मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी गुजरातमधील (Gujrat) ओखा (Okha Port) आणि पोरबंदर (Porbandar Port) या भागात जात असतात. जवळपास दहा ते बारा हजार मच्छीमार कामगार पालघर जिल्ह्यातून (Palghar District) या भागांत रोजगारासाठी जातात. याच भागातील दोन बोटी भरकटल्यानं पाकिस्तान हद्दीत गेल्या आहे. त्यामुळे या बोटींवरील एकूण सोळा मच्छीमार खलाशी मजूर यांना पाकिस्तान सैनिकांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. यामधील सात खलाशी मच्छीमार कामगार पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. 


गुजरातच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या दोन बोटी आणि त्यातील 16 खलाशांना पाकिस्तानी सैनिकांनी अटक केली आहे. 7 खलाशी पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील बोर्डी जवळील एका गावातील हे मच्छीमार खलाशी कामगार आहेत. 


गुजरातमधील ओखा येथील मत्स्यगंधा आणि अन्य एक मच्छीमार बोट मासेमारीसाठी गेली होती. या बोटींवरील एकूण 7 खलाशी पालघर जिल्ह्यातील आहेत. पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीनं या सर्व खलाशांना ताब्यात घेतलं असून त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भातील माहिती पाकिस्तान-इंडिया पीपल्स फॉर्म फॉर पीस अॅन्ड डेमोक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई यांनी दिली आहे. 


पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पालघरमधील 7 खलाशांची नावं : 



  1. 1. नवशा महाद्या भिमरा

  2. सरित उंबरसाडा

  3. विजय नागवंशी

  4. जयराम ठाकर

  5. उमजी पाडवी

  6. विनोद कोल

  7. कृष्णा बुजड