वसई  :  वसई-विरारला (Vasai Virar) अतिरिक्त पाण्याचा (Water Crisis) मुद्दा आता चिघळण्याची शक्यता आहे. वसई-विरारला अतिरिक्त पाणी मिळावे या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणाऱ्या आंदोलकाने सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आंदोलकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


वसईत नानासाहेब कोळेकर या सामाजिक कार्यकर्त्याने दुपारी सॅनिटायझर प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. कोळेकर या तरुणाने वसई विरारला अतिरिक्त पाणी लवकर मिळण्यासाठी  शोले स्टाईलने आंदोलन सुरु केले होते. वालीव तलावाच्या येथील पाण्याच्या टाकीवर चढून त्यांन अनोख आंदोलन सुरु केलं होतं. यावेळी त्याच्या हातात सॅनिटाईझरची बॉटल देखील होती. आपल्याला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न केल्यास आत्महत्या करण्याचाही इशारा त्याने दिला होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वसई विरार अग्निशमन दलाचे कर्मचारी त्याला उतरवण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्याने हातात असलेले सॅनिटायझर प्राशन केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी  त्याला नालासोपारा पूर्वेकडील पालिका रुग्णालयात तातडीने दाखल केले. तेथे त्याच्यावर आता उपचार सुरु आहेत. 


सुर्याच्या नवीन योजनेतून वसई विरार शहराला 185 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. फक्त मंत्र्यांना या योजनेच्या उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने वसई विरारकरांना पाणी मिळत नाही. त्यामुळे मंत्र्यांशिवाय उद्घाटन करा किंवा मंत्र्यांनी लवकरात लवकर वेळ काढून उद्घाटन करावं या मागणीसाठी नानासाहेब कोळेकर या तरुणांने हे वालीव तलावाच्या येथील पाण्याच्या टाकीवर चढून हे अनोख आंदोलन केलं होतं.


वसई विरारमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे.  वसई विरार क्षेत्राला पेल्हार धरणातून 10 एमएलडी,  उसगाव धरणातून 20 एमएलडी, सुर्या जुन्या योजनेतून 100 एमएलडी तर सुर्या नव्या योजनेतून 100 एमएलडी असं एकूण 230 एमएलडी पाणी येतं. वसई-विरारची लोकसंख्या पाहता 230 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या सुर्याच्या नवीन योजनेतून वसई विरार शहराला 185 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. फक्त मंत्र्यांना या योजनेच्या उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने वसई-विरारकरांना पाणी मिळत नाही. त्यामुळे मंत्र्यांशिवाय उद्घाटन करा किंवा मंत्र्यांनी लवकरात लवकर वेळ काढून उद्घाटन करावं या मागणी साठी नानासाहेब कोळेकरने आंदोलन केले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :