पालघर : पालघर रेल्वे स्थानकावर (Palghar ) झालेल्या मालगाडी अपघाताचा परिणाम पश्चिम रेल्वेवर (Western Railway) दिसून येतोय. पहाटेपासूनच डहाणू ते विरार लोकलसेवा (Dahanu - Virar Local) ठप्प आहे. त्यामुळे या भागातून मुंबईकडे कामासाठी येणाऱ्यांचे कमालीचे हाल होत आहेत. गाड्या बंद असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर कामावर जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागलीय.
पश्चिम रेल्वेच्या पालघर स्टेशनजवळ काल संध्याकाळी साडे पाचच्या दरम्यान गुजरातहून मुंबईकडे जाणारी मालगाडीचे डबे घसरल्याने ट्रॅक नंबर दोन तीन आणि चार हे नादुरुस्त झाले. त्यामुळे अप आणि डाऊनची दोन्हीही रेल्वे सेवा प्रभावित झाले आहे.आजही उपनगरीय सेवा बंद असून अप आणि डाऊनच्या काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या ट्रेन विलंबाने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर सुरू असून अजूनही पाच ते सहा तास काम पूर्ण व्हायला लागतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
सध्या उपनगरीय सेवा पूर्णपणे बंद
पहाटेपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. लोकल सेवा बंद असल्याने नोकरदारवर्गाचे हाल होण्याची शक्यता आहे.
1 आणि 2 जून रोजी 36 तासांचा ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 24 डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म 10 आणि 11 च्या विस्तार करण्याचं काम सुरु आहे. प्लॅटफॉर्म 10 आणि 11 चा विस्तार आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे विशेष ब्लॉक चालवण्यात येणार आहे. त्यामुळे 1 आणि 1 जून रोजी 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी सुमारे 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.
सुमारे 600 लोकल रद्द होण्याची शक्यता
सीएसएमटी स्थानकातील एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. 1 आणि 2 जून रोजी मध्य रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक घेण्याचं नियोजन सुरु आहे. या ब्लॉकमुळे मुख्य आणि हार्बर मार्गावरील सुमारे 600 लोकल रद्द होण्याची शक्यता आहे.
लोकलने प्रवाास करणाऱ्यांनाही विलंबाचा फटका
मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे 17 मे पासून 1 जूनपर्यंत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येत आहे. परिणामी मध्य रेल्वेवरील हार्बर तसेच मुख्य मार्गिकेवरील लोकल उशिराने धावत आहेत. नेहमीच्या लोकलबरोबरच पैसा खर्च करुन वातानुकुलीत लोकलने प्रवाास करणाऱ्यांनाही विलंबाचा फटका बसत आहे.