Palghar: जंगलात शिकारीसाठी गेले असता चुकून बंदुकीचे ट्रिगर दाबल्याने पालघर मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे .पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरशेती गावाजवळ जंगलात शिकारीसाठी गेले असता प्राणी समजून चुकून बंदुकीचा ट्रिगर दाबला गेल्याने 60 वर्षीय रमेश जाण्या वरठा यांचा यात मृत्यू झाला आहे .तर एक सहकारीही यात जखमी झाला आहे .ही घटना मंगळवारी रात्री ( 4फेब्रुवारी )8.40 वाजता घडली . बंदुकीचे गोळी लागल्याने मृत्यू झालेल्या इसमाचे नाव रमेश जाण्या वरठा (60)असं आहे . (Palghar)
नक्की घडले काय ?
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रमेश जाण्या वरठा हा आणि त्यांचे सहकारी बारशेती येथील जंगलात रात्रीच्या सुमारास शिकारीसाठी गेले होते.दरम्यान प्राणी समजून एकास सहकार्याकडून चुकून बंदुकीचे ट्रिगर दाबलं गेलं.आणि यात एका इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे .दुर्घटना घडल्यानंतर मृतदेह जंगलातच सोडून सहकारी पसार झाले होते .या घटनेचा अधिक तपास सुरू असून मनोर पोलिसांनी सात ते आठ जण ताब्यात घेतले आहेत .या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अवैध शिकारीच्या घटनांवर कोण नियंत्रण ठेवणार? असा प्रश्न उपस्थित होतोय . पालघर जिल्ह्यात या घटनेमुळे शिकारीसाठी होत असलेला गावठी कट्ट्यांचा वापराचा मुद्दाही ऐरणीवर आलाय .
मृतदेह टाकून सहकाऱ्यांनी काढला पळ
पालघर तालुक्यातील बोर शेती किराट रावते व अकोले या गावातील 10-15 हौशी शिकाऱ्यांनी बोर शेतीच्या जंगलात रानडुकरांच्या शिकारीसाठी जाण्याचा ठरवले होते .बोरशेरीच्या जंगलात अलन डोंगराच्या पायथ्याशी पट्टेरी वाघ आणि 200 किलो वजनापेक्षाही अधिक वजनाची रानडुकरे पाणी पिण्यासाठी येत असल्याचे शिकाऱ्यांना माहीत होते .काही जण या प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलातील झाडांवर बसले होते . गटातील काही सहकारी उशिरा आल्याने तसेच मोबाईलचा टॉर्च बॅटरी ही सुरू केली नसल्याने प्राणी येत असल्याचा संशय बळवला आणि सहकार्याकडून बंदुकीचे ट्रिगर दाबले गेले .बंदुकीच्या गोळीने जखमी होऊन 60 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला . हे लक्षात येताच मृत सहकार्याला तसेच टाकून इतर सहकार्यांनी जंगलातून पळ काढला .जंगलात मृतदेह सापडल्याने आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली .या प्रकरणात मनोर पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतलं आहे .घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले .
हेही वाचा: