पालघर : जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकामध्ये मण्यार जातीचा विषारी साप आढल्याने त्या आरोग्य केंद्रातील नर्स आणि कर्मचाऱ्यांसह, रुग्णवाहिका चालकाची एकच धावपळ उडाली. नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला 2007 पासून रुग्णवाहिका असून, त्या रुग्णवाहिकेला जवळपास 17 वर्ष झाली आहेत. त्यामुळे संपूर्ण रुग्णवाहिका मोडकळीस आणि नादुरुस्त झाली आहे.
तीन दिवसांपूर्वी या रुग्णवाहिकेमध्ये मण्यार जातीचा विषारी साप आढल्याने एकच धावपळ उडाली. हा प्रकार सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला. नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून जव्हार रुग्णालयात एका रुग्णाला घेऊन जाताना प्राथमिक आरोग्य केंद्राजवळच रुग्णवाहिकेच्या बोनटवरती मण्यार जातीचा विषारी साप आढळला. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या चालकासह इतरांची धावपळ उडाली.
या प्राथमिक आरोग्य केंद्रातील जुनाट आणि मोडकळीस अँब्युलन्समधून रुग्णांना जीव धोक्यात ठेवून प्रवास करावा लागतो. त्यात गरोदर महिलांची मोठी तारांबळ होत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील 180 अँब्युलन्सची सीट फाटकी, दरवाजे मोडकळीस आले असून या नादुरुस्त अँब्युलन्सवर भुरीटेक, झाप, न्याहाळे, पवारपाडा, केळघर, वनवासी, भोकरहट्टी असा आठ उपकेंद्रांचा भार आहे.
अनेक गावं-पाडे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येतात. नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मिळावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु त्या नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मिळावी अशी मागणी रुग्ण आणि त्या परिसरातील ग्रामस्थ आणि आरोग्य केंद्राकडून केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Palghar : पालघरमधील दैना थांबेना! पाचघरमध्ये रस्ता नसल्यामुळे वाहन चिखलात रुतलं अन्...
- ...असंही राष्ट्रप्रेम! उत्तरकार्य कार्य थांबवून राबवलं सामूहिक 'जन गन मन अभियान'! पालघरमधील प्रसंग