Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. काही भागात उन्हाचा कडाका आहे. तर काही ठिकाणी पुन्हा अवकळी पावसानं हजेरी लावली आहे. पालघर (Palghar) जिल्ह्याच्या उत्तर भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rains) चांगलीच हजेरी लावली. तलासरीतील अच्छाड परिसरात चांगला पाऊस झाला. सध्या संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


शेतकऱ्यांची चिंता वाढली


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं आज राज्याच्या काही भागात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, या अवकाळी पावसामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कारण शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच गेल्या काही दिवसाखाली झालेल्या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यात आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.


या भागात पावसाची शक्यता


राज्यातील मुंबईसह कोकणातील चार जिल्हे, विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया, वाशिम ते गडचिरोली अशा 11 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, कोल्हापूर सांगली आणि सोलापूरपर्यंत अशा 11 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यताही माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार कोकणात सध्या ढगाळ वातावरण आहे. मात्र, अद्याप कुठेही पाऊस झालेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. सध्या धुळे जिल्ह्यातही ढगाळ वातावरण आहे. अद्याप कुठेही पाऊस झालेला नाही.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather : आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता, वाचा कोणत्या भागात काय स्थिती?