पालघर : आज राज्यभरात मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह पाहायला मिळतो. मात्र गुजरातमधील उंबरगाव येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे या शाळेत सध्या नेपाळी विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसून येते. 1960 साली सुरू करण्यात आलेल्या या उंबरगाव येथील मराठी शाळेत सध्या 15 पेक्षा अधिक नेपाळी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .
महाराष्ट्राच्या सीमेलगत गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील सध्याचे उंबरगाव हे शहर पूर्वी च्या ठाणे जिल्ह्यात होतं. मात्र 1960 नंतरच्या चळवळी नंतर उंबरगाव तालुका गुजरात मध्ये समाविष्ट करण्यात आला. यानंतर या भागातील काही मराठी शाळा बंद झाल्या असून उंबरगाव येथील ही मराठी मिश्र शाळा आजही सुरू असल्याचा पाहायला मिळतंय . 1960 साली स्थापन झालेल्या या शाळेत काही वर्षांपूर्वी 150 ते 200 विद्यार्थ्यांची पटसंख्या असायची. मात्र ती सध्या कमी झाली असून या शाळेत 55 विद्यार्थी मराठी शिक्षण घेत आहेत. असं असलं तरी या 55 पैकी तब्बल 15 पेक्षा अधिक विद्यार्थी हे नेपाळी असून ते मराठीचे धडे गिरवताना पाहायला मिळतात.
मराठी मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी
उंबरगाव येथील या मराठी मिश्र शाळेत विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटताना दिसून येते. या भागात असलेल्या अनेक मराठी मिश्र शाळा मराठी विद्यार्थ्यांच्या पटसंख्या अभावी बंद पडल्या आहेत. त्यातच आता एकमेव सुरू असलेल्या या मराठी शाळेत देखील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने शिक्षकांकडून देखील चिंता व्यक्त करण्यात येते .
उंबरगाव हा पूर्वीचा महाराष्ट्रातील भाग. मात्र चळवळीनंतर तो गुजरातमध्ये समाविष्ट झाला. या भागात आजही पालघर ठाणे या परिसरातील मराठी बांधव राहत असून त्यांनी देखील आपल्या पाल्यांना या मराठी शाळांमध्ये पाठवण्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे.
ही बातमी वाचा :