Vasai Virar Crime: वसई विरारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं चित्र दिसून येत आहे. दोन कोटींची खंडणी मागत गुंडांनी एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. पोलीस ठाण्यात एनसी दाखल केल्यानंतर गुडांनी दिवसाढवळ्या हल्ला केल्याची ही एका आठवड्यातील दुसरी घटना आहे.
वसईच्या एका बांधकाम व्यावसायिकाकडे दोन कोटीची खंडणी मागणाऱ्या गुंडानी त्या व्यावसायिकांने पोलीस ठाण्यात तक्रार देताच दुसऱ्या दिवशी गुंडांनी तलवारीने हल्ला केल्याची घटना नायगांवच्या जुचंद्र येथे घडली आहे. याप्रकरणी नायगांव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेत आहेत. गुंडाच्या दहशतीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत.
नायगाव येथील जूचंद्र येथे 21 जून रोजीची ही हल्लेखोरांची दहशत सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. खुलेआम तलवारीने दहशत माजवण्याचा प्रयत्न गुंड करत आहेत. जुचंद्र येथे बांधकाम व्यावसायिक जितेंद्र यादव यांचा बिंधशक्ती रियल इस्टेट अॅन्ड इन्फ्रा प्रायवेट लिमिटेड नावाचे ऑफिस आहे. 19 जूनला आरोपी गिरीश नायर याने जितेंद्र यादव यांना फोन करुन, जमिनीसंदर्भात भेटायच बोलून भेट घेतली आणि दोन कोटीची खंडणी मागितली.
दुसऱ्या दिवशी गिरीश नायरचे तीन गुंड आले आणि त्यांना जमिनीचे लिटिगेशन दूर करायचे असतील तर शेटला एक कोटी उद्या पाठवून द्यायला सांग नाहीतर तुझ्या ऑफीसमध्ये तुला आणि तुझ्या स्टाफला ठार मारेन असा दम दिला. त्यानंतर सायंकाळी जितेंद्र यादव यांनी याबाबतची तक्रार नायगांव पोलीस ठाण्यात दिली. मात्र नायगांव पोलिसांनी याबाबत म्हणावी तशी अॅक्शन घेतली नाही. गिरीश यादव आणि त्याच्या 10 गुंडांनी दुसऱ्या दिवशी तलवारी आणि लोखंडी रॉडने थेट जितेंद्र यादवच्या कार्यालयावर हल्ला चढवला. जितेंद्र यादव यांच्या दोन गाड्या फोडल्या, अंकुश भुवड आणि जितेंद्र यादववर तलवारीने वार केले. दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं
अंकुश भुवड यांच्या डोक्यावर तलवारीनचे वार लागलेत. तसचे जितेंद्र यादव यांच्या पायावर वार केले गेलेत. याबाबत जितेंद्र यादव यांनी नायगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपी गिरीष नायर, अहमद शेख, रियास शेख, फिरोज शेख, निलेश कांबळे, मोईद्दिन उर्फ मनी शेख, तेज उर्फ टिप्पा सोनावणे, विशाल चव्हाण, डी उर्फ जनक, रुपेश शिंदे आणि प्रथमेश दळवी या अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गिरीश याचे फोटो नितेश राणे यांच्या सोबत आहेत. पोलिसांनी 24 तास उलटूनही यात अजून एकालाही अजून अटक करण्यात आली नाही.