पालघर : ऋषिकेश  बद्रीनाथ ( Rishikesh Badrinath)  मार्गावरील ब्रह्मपुरीजवळ झालेल्या अपघातात मनोर येथील जितेश लोखंडे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीने मनोर गावात (Manor) हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बद्रीनाथ मार्गावरील ब्रह्मपुरीजवळ झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जणांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले मात्र उपचारासाठी आलेल्या तीन जणांपैकी एका व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या तीनवरून चार झाली आहे.


मनोर गावात शोककळा


गाडीतील सर्व जण बद्रीनाथ धाम दर्शनासाठी जात होते. ब्रह्मपुरीजवळ अचानक कारचे नियंत्रण सुटून (Car Accident) कार दरीत कोसळली. यावेळी या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या चार झाली आहे. मृत्यू झालेल्या चार व्यक्तींमध्ये एक व्यक्ती मनोरचे आहे. जितेश प्रकाश लोखंडे असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण मनोर गावात शोककळा पसरली आहे. या वृत्ताने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. लोखंडे यांना अध्यात्माची आवड असल्याने पंढरीच्या वारीमध्ये ते दरवर्षी सहभागी होत असे. भजन कीर्तनात नियमितपणे भाग घेत होता. मनोर परिसरातील वारकरी संप्रदायात त्याला हभप जितेश महाराज म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई आणि वडील असा परिवार आहे.


ब्रह्मपुरीजवळ अचानक कारचे नियंत्रण सुटून कार दरीत कोसळली


तर कार चालक रविंद्र सिंग पुत्र ज्ञान सिंग हा उखीमठ जिल्हा रुद्र प्रयागचा रहिवासी आहे. या चालकाची प्रकृती स्थिर आहे. चालक रवींद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पाच प्रवासी हरिद्वारहून बद्रीनाथ धामसाठी निघाले होते. ब्रह्मपुरीजवळ अचानक कारचे नियंत्रण सुटून कार दरीत कोसळली.  मुनीचे एसएसआय रमेश कुमार सैनी यांनी सांगितले की, अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या चार झाली आहे.


संबंधित बातम्या :


Sangli Crime : जीपचा टप एकीकडे, खालचा भाग दुसरीकडे; सांगली- नांद्रे रोडवर भीषण अपघातात दोन तरुणांचा करूण अंत