Cyrus Mistry Death in Car Accident : टाटा समूहाचे (Tata Group) माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं काल (रविवारी) निधन झालं आहे. रस्ते अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील (Mumbai-Ahmedabad Highway) चारोटी येथे हा अपघात झाला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून महाराष्ट्र बॉर्डरवरील अछाड ते घोडबंदर अशा 118 किलोमीटरच्या पट्ट्यात 29 ब्लॅक स्पॉट असून या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. 2014-15 मध्ये याच ब्लॅक स्पॉटची संख्या साधारण 82 होती. त्यानंतर ती कमी होऊन 29 वर आली. मात्र अजूनही अपघातांच्या संख्येमध्ये कमी होताना दिसून येत नाही. वर्षभरात साधारणत: चारशेच्या आसपास बळी गेल्याची माहिती येथील जाणकारांनी दिली आहे


तीन लेन्स अचानक दोन लेनमध्ये बदलतात!


ज्या ठिकाणी सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात झाला. तो सुद्धा ब्लॅक स्पॉट असून चारोटीचा उड्डाणपूल उतरताच वाहन वेगाने येतात. हा पूल उतरताना तीन लेन आहेत. त्या तीन लेन्सचं अचानक दोन लेनमध्ये रूपांतर होतं आणि त्यावेळेस वाहनचालकांचा गोंधळ उडतो. या पुलाला थेट सूर्य नदीच्या पुलाचा कठडा बाहेर निघालेला आहे. त्याला धडक बसते. अशाच प्रकारे हा अपघात झाला असून या अगोदरही येथे काही अशाच प्रकारे अपघात झाले आहेत. त्याच्यामध्येही काही जणांचे बळी गेले आहेत. 


परंतु एन एच ए आय राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि संबंधित टोल वसूल करणारी यंत्रणा याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे असे अपघात घडत असल्याची माहिती ऑल इंडिया चालक-मालक संघटनेचे प्रवक्ता हरबनसिंह नन्नाडे यांनी दिली आहे.


सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी 


रविवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट करत सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली. ते ट्वीटमध्ये म्हणाले की, "पालघरनजिक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितलं आहे." तसेच, "प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.", त्यांनी सायरस मिस्त्रींना श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. 



महत्त्वाच्या इतर बातम्या :