वसई : वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार आणि अन्य अधिकाऱ्यांना आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी दिलेल्या कथित धमकीबद्दल महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे. भादंविच्या कलम 353 मध्ये सुधारणा करण्याची शासनाची कारवाई एकतर्फी आणि अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी आहे. वसई विरारसारख्या अनुचित घटनांची वाढ होऊ शकते. त्यामुळे यासाठी एक बैठक तातडीने घेण्याची मागणी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. राजपत्रित अधिकारी महासंघ ही राज्यातील वर्ग अ आणि ब च्या अधिकाऱ्यांची संघटना आहे.


वसई-विरारमधील आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एका कार्यक्रमात 'पालिका कार्यालयात येऊन तुम्हाला फटकावीन' असा दम अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. यात लिहिलं आहे की, "सार्वजनिक कार्यक्रमात लोकप्रतिनिधींकडून भा.प्र.से. अधिकाऱ्यांसह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपशब्द वापरुन स्पष्टपणे धमकावण्याची घटना निश्चितच चिंताजनक आणि संतापजनक असल्याचं या म्हटलं आहे. सरकारी कर्मचारी, राज्य अधिकाऱ्यांना हल्ले व धमक्यांपासून संरक्षण देणारे भादंविच्या कलम 353 मध्ये सुधारणा करणार असल्याची भूमिका फडणवीस यांनी अलीकडे विधिमंडळ अधिवेशनात घेतली होती. परंतु या कायद्यामध्ये तातडीने बदल करण्याची शासनाची कारवाई ही एकतर्फी आणि अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारा हा कायदा निष्प्रभ झाला आहे. परिणामी वसई विरारसारख्या अनुचित घटनांची वाढ होऊ शकते. त्यामुळे यासाठी एक बैठक तातडीने घेण्यात यावी."


हितेंद्र ठाकूर काय म्हणाले होते?


15 ऑगस्ट रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेचा ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यावर, कार्यालयाच्या बाहेरच जनता दरबार भरवण्यात आला. त्यावेळी नागरिकांनी शहरातील पाणीटंचाई, पावसाळ्यात पाणी साचणं, रस्त्यावरील खड्डे याबाबत जाब विचारला असता, याला ठाकूरांनी पालिकेला जबाबदार ठरवलं. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना लोकांसमोरच धारेवर धरले. या बैठकीत जनतेने विचारलेल्या प्रश्नावर आयुक्त, उपायुक्त उत्तर देत असताना असभ्य भाषेत तसेच शिवराळ भाषेत जाब विचारला. स्वतःला प्रशासकीय राजे समजता का... ऑफिसमध्ये येऊन फटकावेन, कमिशनरसाहेब, तुम्हाला बोलतोय, ऑफिसमध्ये येऊन फटकावेन, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले होते. त्यानंतर आता अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.


VIDEO : Hitendra Thakur : अधिकाऱ्यांना झापताना हितेंद्र ठाकूरांची जीभ घसरली Abp Majha