Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) एक आठवडा उलटलाय. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतानं आपले इरादे स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर शत्रूला धडा शिकवण्यासाठी भारतानं आता रणनीती आखायला सुरूवात केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली. ज्यात संरक्षण मंत्र्यांसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते. मात्र याचदरम्यान जम्मू काश्मीरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील एका पर्यटकाने दहशतवाद्यांपैकी एकाने मला तु काश्मीरी आहेस का?, असा प्रश्न विचारल्याचा दावा केला आहे.

Continues below advertisement


जालनामधील आदर्श राऊत काय म्हणाला? 


पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. जालन्यातील आदर्श राऊत नावाच्या युवकाने हल्ल्याच्या आदल्या दिवशी एका संशयित व्यक्तीने त्याच्याशी संवाद साधत, "तू काश्मीरी आहेस का?" आणि "हिंदू आहेस का?" असे प्रश्न विचारले होते. तसेच आज गर्दी कमी आहे, उद्या पुन्हा येऊया अशी आपापसात चर्चा केल्याचाही दावाही आदर्श राऊतने केला आहे. विशेष म्हणजे, हीच व्यक्ती हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या रेखाचित्राशी मिळतीजुळती असल्याचा दावा देखील  या युवकाने केला आहे. आता या संशयावरून त्याने थेट NIA ला ई-मेल करून माहिती देखील दिली आहे. राऊत कुटुंब सुट्ट्यामुळे पहलगामला गेले होते. 21 एप्रिलला आपल्याला प्रश्न केले होते दरम्यान हल्ला झाल्यानंतर रेखाचित्र जारी झाल्यावर आपल्याला रेखाचित्रतील आरोपीचा चेहरा आठवल्याचं आदर्श राऊत यांनी म्हटलं आहे.


पाकिस्तानचे धाबे दणाणले-


पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कारवाई होईल या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. दहशतवाद, प्रांतिक स्वायत्ततेच्या मागण्या आणि धार्मिक कट्टरतावादाच्या विळख्यात पाकिस्तान आधीच खिळखिळा झाला आहे. खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान, सिंध आणि पाकव्याप्त काश्मीर या चारही प्रांतात अंतर्गत बंडाळीची चिन्हं दिसत आहेत.


पाकिस्तानी लष्करातील राजीनाम्याच्या बातम्या समोर-


पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आपले इरादे स्पष्ट केले आणि पाकिस्तानी लष्कराला धडकी भरली. गेल्या काही दिवसात पाकिस्तानी लष्करातील राजीनाम्याच्या बातम्या समोर आल्या. आणि याचं महत्वाचं कारण होतं लष्करप्रमुख असीम मुनीर. मुनीर पाकिस्तानी सैन्याचा वापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप होतोय आणि त्यांच्याच चिथावणीखोर वक्तव्यांमुळे पहलगाम हल्ला झाल्याचं एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.




संबंधित बातमी:


India Vs Pakistan War: पाकिस्तानच्या मदतीला पहिला देश मैदानात, दारुगोळ्याने भरलेली विमानं अन् फायटर जेट्स मदतीला धाडली