Health Tips : माणसाला पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. आपल्याला नेहमी सांगितले जाते की किमान 7-8 तास झोप घ्या. काही लोकांची समस्या अशी आहे की त्यांना नेहमी झोपावसं वाटतं. म्हणजेच पुरेशी झोप घेऊनही ते पुन्हा झोपू शकतात. काही लोकांना 10-12 तास झोपल्यानंतरही थकवा जाणवतो. असं का होतं, तुम्ही कधी विचार केला आहे का? चला या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
दिवसभर थकवा जाणवण्याची कारणे-
1. कामामुळे रात्री उशिरा झोपणे
2. 7-8 तासांची झोप न लागणे
3. निद्रानाश हे आरोग्याच्या स्थितीमुळे किंवा झोपण्याच्या विकारामुळे देखील होऊ शकते
4. खूप ताण घेणे
5. चहा किंवा कॉफीचे अतिसेवन
6. शारीरिक हालचाल कमी
7. दिवसभर सुस्त राहणे
8. ड्रग्ज, अल्कोहोल किंवा सिगारेटचा अतिवापर
9. लठ्ठपणा
10. मधुमेह
पुरेशी झोप घेऊनही तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल आणि खूप झोप येत असेल तर तुम्ही या आजारांना बळी पडू शकता.
1. टाईप 2 मधुमेह
2. हृदयरोग
3. लठ्ठपणा
4. नैराश्य
5. डोकेदुखी
जास्त झोपणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते, अशा परिस्थितीत तुमच्या जीवनशैलीत काही सुधारणा करून तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की जास्त झोपणे हे कोणत्याही आजाराचे लक्षण आहे का किंवा त्यांना कोणताही गंभीर आजार झाला आहे का? दिवसभर या गोष्टींचा विचार केल्याने तुमच्या मनावर आणखी दबाव वाढतो आणि त्यामुळे तुम्हाला रात्री नीट झोप येत नाही आणि इतर अनेक आजारांना बळी पडतात. जास्त विचार करण्यावर कोणताही इलाज नाही, पण या उपायांनी तुम्ही जास्त झोपेची समस्या दूर करू शकता. हे उपाय खालीलप्रमाणे आहेत.
1. झोपेच्या आणि उठण्याच्या वेळा सेट करा
2. रूमचे तापमान तुमच्यानुसार सेट करा
3. जर तुम्हाला अंधाराची भीती वाटत नसेल तर दिवे बंद करून झोपा.
4. आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्या
5. रात्री पोटभर जेवू नये
6. तुम्ही तुमच्या आवडीचे परफ्यूम खोलीत फवारू शकता
7. झोपण्यापूर्वी पुस्तक वाचा
8. झोपण्यापूर्वी आंघोळ करायला विसरू नका
9. रूममध्ये सायलेंट म्युझिक लावू शकता.
10. झोपण्याच्या एक तास आधी मोबाईलपासून अंतर ठेवा
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :