तुळजापूर : महाराष्ट्राचे मुखमंत्री ऐकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सहकुंटुंब शनिवारी सांयकाळी तिर्थक्षेत्र तुळजापुरात श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी लता शिंदे यांनी दहीदूध पंचामृताचा अभिषेक करुन देवीला साडीचोळी अर्पन करून नवसपूर्ती केली.
राज्यातील जनतेवर आणि शिंदे कुंटुंबियांवर कायम कृपादृष्टी राहू दे असे साकडे लता शिंदे यांनी देवीला घातले. यावेळी मुलगा श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी वृषाली, मुखमंत्र्यांचे मोठे बंधू आणि त्यांची पत्नी असे शिंदे कुटुंब नवसपूर्तीवेळी उपस्थितीत होते.
मिसेस मुख्यमंत्री सांयकाळी सहा वाजता तुळजापूर येथे दाखल झाल्या. सात वाजता त्यांनी तुळजाभवानी मंदिरात देवीची खणानारळाने ओटी भरुन शिंदे कुंटुंबियांनी देविचरणी नतमस्तक होवून दर्शन घेतले. या पुजेचे पौराहित्य पुजारी प्रशांत दिलीपराव गंगणे यांनी केले.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, उस्मानाबाद जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष नारायण नन्नवरे, विक्रम देशमुख, शिवाजी बोदले, गिरीष देवळालकर, श्रीतुळजाभवानी प्रक्षाळ मंडळ अध्यक्ष विशाल रोचकरी, शिवाजी बोदले, प्रसाद पानपुडे, गिरीष देवळालकर यांच्यासह भाजपे कार्यकते मोठ्या संखेने उपस्थितीत होते. यावेळी मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शिंदे परिवाराकडू देवीचा कुलधर्मकुलाचार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील, आई, पत्नी, दोन भाऊ मुलगा श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाले त्यांचे आईवडील यांच्यासह शिंदे परिवारातील जवळपास 25 ते 30 जण शिंदे परिवारातील मंडळी कुलधर्मकुलाचार करताना सहभागी झाले होते.
शिंदे परिवाराच्या वतीने श्रीतुळजाभवानी मातेस सहकुंटुंब कुलधर्मकुलाचार करण्याचा निर्णय मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौभाग्यवती यांनी घेतला. तुळजापुरात कुलधर्मकुलाचार करुन नंतर शिंदे कुटुंब आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूकडे रवाना झाले.
महत्वाच्या बातम्या