Numerology Mulank 3 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 3 च्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. या मूलांकाचा स्वामी गुरु ग्रह आहे, जो गुरूच्या कृपेने या लोकांना सुख, सौभाग्य आणि बुद्धिमत्ता लाभते.
मूलांक 3 चे लोक हे फार खर्चिक असतात, त्यांना आलिशान जीवन जगायला आवडतं. चांगल्या ब्रँडचे कपडे आणि सर्व ब्रँडेड गोष्टी वापरण्याचा शौक यांना असतो. या मूलांकाच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज असते. हे लोक प्रत्येक कामात प्रचंड घाई करतात आणि त्यांचा हा स्वभाव त्यांना एकदाच चांगला नडतो. या मूलांक संख्येबद्दल (Numerology) अधिक जाणून घेऊया.
प्रचंड खर्चिक असतात या जन्मतारखेचे लोक
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक फार खर्चिक असतात. वायफळ खर्च करायला त्यांना आवडतं. या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असते. मूलांक 3 असलेल्या लोकांकडे पैशाची कमतरता नसते, परंतु ते भविष्याचा विचार न करता आपले पैसे खर्च करत राहतात.
कधी कधी इतरांकडे मागावे लागतात पैसे
अनावश्यक खर्चामुळे मूलांक 3 च्या लोकांवर अनेक वेळा कर्ज घेण्याचीही परिस्थिती उद्भवते. महिन्याच्या सुरुवातील हे लोक जोषात असतात, आलिशान जीवनशैली बाळगण्याच्या नादात नको तेवढा पैसा खर्च करतात आणि महिन्याच्या अखेरीस तंगीला सामोरे जातात. नाईलाजाने त्यांना इतरांकडे पैसे मागावे लागतात.
अति घाई, संकटात नेई
मूलांक 3 च्या लोकांना प्रत्येक कामात घाई करण्याची सवय असते आणि हीच घाई या लोकांना चांगलीच नडते. छोट्यातल्या छोट्या कामात हे लोक अतिउत्साह दाखवतात. पटापट काम करण्याच्या नादात यांच्या हातून कामं बिघडतात आणि याचा दुप्पट भुर्दंड त्यांना सोसावा लागतो.
नाकाच्या शेंड्यावर असतो राग
3, 12, 21 किंवा 30 जन्मतारखेचे लोक रागीट असतात. त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच प्रगतीचे मार्ग सुकर होतील. अनेक वेळा हे लोक समोरच्या व्यक्तीचंही ऐकत नाहीत आणि यामुळे लोक यांच्यापासून दूर राहतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: