NEET Exam 2026 Online : वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) संपूर्ण देशात घेण्यात येणारी नीट परीक्षा (NEET Exam) आगामी काळात संगणकावर आधारित घेतली जाणार असल्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. केंद्रीय शिक्षण विभाग व केंद्रीय आरोग्य विभाग या परीक्षेच्या सुरक्षा आणि समानतेच्या संदर्भात व्यवहार्यता तपासत असून तसे प्रयत्नही सुरू झाले आहेत. त्यामुळे 2026 साली मे महिन्यात होणारी नीटची परीक्षा संगणकावर आधारित होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
एनटीए, आरोग्य मंत्रालय आणि केंद्रीय शिक्षण विभागाकडून पडताळणी
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूत्रांच्या हवाले ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही परीक्षा पेन-पेपर तत्त्वावर होत होती. मात्र यामुळे अनेकदा पेपर लीक होण्याची शक्यता निर्माण होत असे. मात्र संगणकावर आधारित ही परीक्षा घेण्यात आली तर सुरक्षा, पारदर्शक व समानतेच्या आधारावर होईल, असं तज्ञांच मत आहे. आगामी काळात संगणकावर आधारित नीट परीक्षेसाठी एनटीए, आरोग्य मंत्रालय आणि केंद्रीय शिक्षण विभाग या संबंधी पडताळणी करत आहेत.
वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवून 25 लाखांची फसवणूक
गडचिरोली : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचे आमिष दाखवून शिक्षक दांपत्याची 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अहेरी येथे समोर आला आहे. याप्रकरणी अहेरी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहेरी येथील विलास खरवडे आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा खरवडे यांनी आपल्या मुलीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी फेसबुकवर एक जाहिरात बघून त्यावर संपर्क साधला. तेव्हा समोरून एका महिलेने माहिती दिली. त्यानंतर छत्तीसगडमधील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत दिल्ली येथील अमित कुमार नामक व्यक्तीने शिक्षक दांपत्याकडून तीन टप्प्यात तब्बल 25 लाख उखळले. अमित कुमारने 90 लाखांची मागणी केली होती. 65 लाखात प्रवेश देण्याचे ठरल्यानंतर खरवडे दाम्पत्यांनी 25 लाख दिले. मात्र पैसे मिळतात अमित कुमारने फोन घेण्यास किंवा संवाद करण्यास टाळाटाळ केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे कळताच खरवडे दाम्पत्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ही बातमी वाचा:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI