Priya Marathe Husband Shantanu Moghe Returns To Work: मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं 31 ऑगस्ट रोजी निधन झालं. प्रियानं आजवर अनेक भूमिका साकारल्या आणि त्या गाजवल्याही. मराठी चित्रपटसृष्टीसोबच (Marathi Industry) प्रियानं हिंदी मालिकाविश्वातही काम केलं. पण, कर्करोगाशी देत असलेली झुंज अपयशी ठरली. प्रिया मराठेच्या निधनानंतर एक हरहुन्नरी अभिनेत्री इंडस्ट्रीनं गमावली. प्रियाच्या कठीण काळात तिचा पती अभिनेता शंतनू मोघे (Actor Shantanu Moghe) तिच्यापाठीशी खंबीरपणे उभा होता. प्रिया आजारी असल्यापासून म्हणजे, जवळपास 15 महिने शंतन प्रियासोबत होता. पण, आता प्रियाच्या निधनानंतर स्वतःला सावरुन एक कलाकार म्हणून शंतनू पुन्हा प्रेक्षकांसमोर उभा राहिला आहे. 

Continues below advertisement

प्रियाचं निधन होण्याच्या काही दिवस आधीच शंतनूनं नव्या मालिकेत काम करायला सुरुवात केलेली. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रियानं या मालिकेचा पहिला भाग पाहिलेला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिनं अखेरचा श्वास घेतला. त्यावेळ शंतनूला काम थांबवावं लागलेलं. पण आता स्वःला सावरुन शंतनू मोघे मालिकेच्या सेटवर परतला असून शुटिंगला सुरुवात केली आहे. प्रियाच्या निधनाच्या आधी शंतनु मोघेने स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. या मालिकेत तो मंजिरीच्या भावाची भूमिका साकारत आहे. आपल्या वेदना, दुःख बाजूला सारुन 'शो मस्ट गो ऑन' म्हणत शंतनूनं आता पुन्हा एकदा मालिकेत काम करायला सुरुवात केली आहे. काम करत राहणं हीच प्रियाला माझी श्रद्धांजली आहे, असं शंतनू म्हणाला आहे. 

महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शंतनू मोघेंनं आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. तसेच, प्रियाच्या निधनानंतर 15 दिवसांतच कामावर रूजू होण्याबाबत अभिनेता शंतनू मोघे म्हणाला की, "मधल्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं गरजेचं होतं. म्हणून मी कुठेही दिसलो नाही. आयुष्यातलं ते वळण पार केल्यानंतर आता पुन्हा कामावर परतलोय."

Continues below advertisement

काम करत राहणं हीच प्रियाला माझी श्रद्धांजली : शंतनू मोघे

"माझे वडील नेहमी सांगायचे की, आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो... त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात किती संघर्ष असला तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहायचं. त्यात कसर सोडायची नाही. व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं. वैयक्तिक सुख-दु:ख खुंटीला बांधून आपण साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं सुख दु:ख आपलंसं करणं हाच कलाकाराचा धर्म असतो. काहीही झालं तरी आपल्या कलेशी असलेली कमिटमेंट पाळायची हा आपण स्वत:शीच केलेला करार असतो. त्यामुळे काम करत राहणं हीच प्रियाला माझी श्रद्धांजली आहे. आजपर्यंत प्रिया आणि माझ्यावर सर्व प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं हीच आमची खरी ताकद आहे...", असं शंतनू मोघे म्हणाला.

पुढे बोलताना शंतनू मोघे म्हणाला की, "माझी मालिकेत शंतनू ही मंजिरीच्या दादाची भूमिका आहे. या भूमिकेला अनेक छटा आहेत. सध्या मी नकारात्मक भूमिकेत वाटत असलो तरी इतर छटा लवकरच प्रेक्षकांच्या समोर येतील. तसंच मधल्या काळात मला समजून घेतल्याबद्दल मी स्टार प्रवाह वाहिनी, सतीश राजवाडे आणि सोल प्रोडक्शनचा कायमच ऋणी असेन."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shantanu Moghe On Star Pravah Marathi Serial: प्रियाच्या जाण्याने शंतनू पुरता खचला, पण 15 दिवसांत स्वतःला सावरुन कॅमेऱ्यासमोर पुन्हा उभा राहिला