नंदुरबार : नवापूर शहराजवळ गॅस टँकर लिक झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या टँकरमध्ये हॅड्रो क्लोरिक ऍसिडचा असल्याचं म्हटंलं जात आहे.

नागपूर-सुरत महामार्गावरील रंगावली नदीजवळ हा गॅस टँकर आणि एका ट्रकचा अपघात झाला. यानंतर गॅस टँकरमधून गॅस लिक होण्यास सुरुवात झाली. यामुळे संपूर्ण शहरात गॅस पसराला असून, परिसरात गॅसचे पांढरे धुके पसरले आहेत.

गॅस गळती झालेल्या टँकरमध्ये हॅड्रो क्लोरिक ऍसिडचा असल्याचं म्हटंलं जात आहे. या घटनेनंतर स्थानिक अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन, गॅस गळतीवर नियंत्रण मिळवलं.

पण गॅस गळतीमुळे जवळपास 2 ते 3 किलोमीटर पांढऱ्या धुराचे लोण पसरले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.