शुक्रवारी रात्री किरण बेदी जेव्हा महिला सुरक्षेची तयारी पाहण्यासाठी बाहेर पडल्या, तेव्हाची ही दृश्यं आहेत. किरण बेदी जेव्हा वाहतूक पोलीस सेवेतमध्ये कार्यरत होत्या, त्यांच्या कार्यकाळात त्या कडक वाहतूक शिस्तीसाठी ओळखल्या जात होत्या.
विशेष म्हणजे किरण बेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून, यात त्यांनी पुदुच्चेरीत रात्रीच्या काळी महिला कितपत सुरक्षित आहेत, हे पाहण्यासाठी आपण दुचाकीवरुन ही रपेट मारल्याचं म्हटलंय.
दरम्यान, किरण बेदी यांच्या या व्हिडीओवरुन नेटिझन्सनी त्यांच्यावर टीका केली आहे. शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किरण बेदींकडून वाहूतक शिस्तिचं पालन होत नसल्यानं, नेटिझन्सनी यावर कमालीची नाराजी व्यक्त केली आहे.