Navi Mumbai Morcha : नवी मुंबईत (Navi Mumbai) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते मोर्चा काढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. या मोर्चासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नवी मुंबईत पोहोचले आहेत. आजूबाजूच्या जिल्ह्यातले कार्यकर्तेही या मोर्चासाठी दाखल  झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.


मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे गटाचं शक्तिप्रदर्शन
या मोर्चाच्या निमित्तानं ठाकरे गटाकडून नवी मुंबईत शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. सीबीडी बेलापूर ते नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा असणार आहे. नवी मुंबईत आज सरकारविरोधात आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार, आमदार, पदाधिकारी, शिक्षकसेना पदाधिकारी, भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, कामगार सेनेचे पदाधिकारी, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगसेवक, सरपंच, ग्रा.पं.सदस्य शिवसेना संलग्न संघटना सीबीडी बेलापूर ते नवी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढणार आहेत.


मोर्चाचं व्हिडीओ रेकॉर्डिंग, प्रक्षोभक भाषण केल्यास गुन्हा दाखल होणार
नवी मुंबईत ठाकरे गटाच्या आज होणाऱ्या मोर्चाचं व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रक्षोभक भाषणं केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाचे नेते एम के मढवी यांच्यावर केलेल्या तडीपारीच्या कारवाईचंही समर्थन पोलिसांनी केलं आहे.


सरकारला राज्यातून तडीपार करण्याची वेळ : अंबादास दानवे
खासदार विनायक विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार मनिषा कायंदे, विधानसभेचे गटनेते अजय चौधरी मोर्चासाठी नवी मुंबईत पोहोचले आहेत. ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून आता ते वाल्याचे वाल्मिकी झाले का, असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्यांनी विचारला आहे. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर जाणीवपूर्वक गुन्हे नवी मुंबई पोलीस करत आहेत त्यासाठी आम्ही हा तडीपार मोर्चा आयोजित केला आहे
भास्कर जाधव यांच्या घरावर काल हल्ला करण्यात आलेला आहे आम्ही याचा निषेध करतो. सध्या खुनशी राजकारण पाहायला मिळत आहे. आता राज्यभरातूनच या सरकारला तडीपार करण्याची वेळ आलेली आहे लवकरच आम्ही या सर्वांना तडीपार करु, असं अंबादास दानवे म्हणाले.


VIDEO : Thackeray Group Protest in Navi Mumbai : ठाकरेंच्या शिवसेनेचा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयावर मोर्चा