नवी मुंबई : कल्याण ग्रामीणमध्ये (Kalyan) असलेल्या 14 गावांचा नवी मुंबई महानगर पालिका (Navi Mumbai Municipal Corporation) क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या निर्णयानंतर 14 गावातील ग्रामस्थांनी फटाके वाजवून, पेढे भरवत शासनाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) आणि गाव विकास समिती यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. पालिकेने आज याला मंजुरी दिली आहे.


कल्याण ग्रामीणमधील 14 गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश


नवी मुंबई पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कल्याण ग्रामीणमधील त्या 14 गावांना नवी मुंबई पालिकेत सामावून घेण्यास मंजूरी दिली आहे. नवी मुंबई पालिकेत नव्याने समावेश झालेल्या कल्याण तालुक्यातील 14 गावांची नावे खालीलप्रमाणे आहेत. यामध्ये दहीसर , पिंपरी, वालीवली, मोकाशी, गोठेघर, उत्तरशिव, नागांव, निघु, नावाळी, नारिवली, भंडार्ली, बाळे, वाकळण, बाभळी या गावांचा समावेश आहे.


11 तारखेपासून सुरुवात मालमत्ता हस्तांतरण


14 गाव सर्वं पक्षीय विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नाना यश आलं आहे. मागील काही काळापासून यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा सुरु होता. यासंदर्भात मंगळवारी नवी मुंबई पालिका आयुक्तांनी आदेश काढला आहे. नवी मुंबई पालिकेच्या 4 अभियंत्यांना मुळं विभागाची कामं सांभाळून अतिरिक्त  14 गावांचे कामकाज पाहायाचे आहे, असा आदेश नवी मुंबई पालिकेच्या आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आदेश काढले आहेत. 14 गावांच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या कामाला 11 तारखेपासून सुरुवात होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तानी दिली आहे.


'ती' 14 गावं नवी मुंबई महापालिकेत


2000 साली ही चौदा गावे नवी मुंबई पालिकेत होती. मात्र, महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या कर आकारणीला विरोध करीत 14 गावांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर गावांचा विकास न झाल्याने अखेर परत एकदा नवी मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारित येण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. याला ग्रीन सिग्नल देत नवी मुंबई महानगर आयुक्त कैलाश शिंदे यांनी चौदा गावांमध्ये विकास कामे करण्याचा आराखडा बनवला आहे. यासाठी महानगर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.




महत्त्वाच्या इतर बातम्या :


वरळी हिट अँड रन : 60 तासांचा खेळ, 15 मिनिटांत खलास; पोलिसांना कसा सापडला आरोपी मिहीर शाह?