नाशिक : तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी कामांचा धडाका लावला. मात्र त्यांचा एक निर्णय वादात सापडला आहे. आधी लोकप्रतिनिधींचा विरोध आणि आता सामान्य नाशिककरही मुंढेंच्या विरोधात उभं राहिले आहेत.

नाशिक महापालिकेने घरपट्टीत मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. त्याविरोधात मी नाशिककर मोहीम सुरु केली आहे.

मी नाशिककर झेंड्या खाली विविध क्षेत्रातील संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न  केला जात आहे. राजकीय पक्ष हतबल झाल्याने त्यांच्या पाठिंब्याखाली आंदोलनाला दिशा दिली जात आहे. शहरातील इंच न इंच जमिनीवर कर लावण्याची घोषणा मुंढेंनी केल्याने शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे.

करवाढीच्या कचाट्यात शिक्षण संस्थांचं मैदान आणि शेतीही येते. एकरी जवळपास 65 हजार रुपये वर्षाकाठी कर लागणार आहे. त्यामुळे हा पैसा शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कातून वसूल केला तर त्याचा फटका पालकांना बसण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.