नाशिक : विरोधी आघाडी मजबूत करायची असेल तर युपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावे, अशी आमची इच्छा आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार राऊत राऊत यांनी केलं. सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणामुळे सक्रीय राजकारणात नाहीय. त्यामुळे सध्या पवार हेच सक्षम नेतृत्व असल्याचे राऊत म्हणाले. राऊत आज नाशिकमध्ये होते. राऊत यांनी आज नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. तसंच सचिन वाझे प्रकरणावर बोलताना कुणीही आलं आणि कोणत्याही प्रकरणाचा तपास केला तर सत्य समोर येईलच, राज्यातील सरकार पाडण्यासाठी हा खटाटोप सुरु असून कोणतीही तपास यंत्रणा आणली तरी सरकारला धोका नसल्याचे राऊत म्हणाले.


पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं : राऊत
“शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसने नेतृत्व केलं. देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असे वाटत असेल तर यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं. आतापर्यंत सोनिया गांधी यांनी यूपीएचं नेतृत्व चांगल्या प्रकारे केलं. मात्र, सोनिया गांधी सध्या सक्रिय राजकारणात नाहीयेत. आज अनेक प्रादेशिक पक्ष हे युपीएमध्ये नाहीयेत. पण त्यांना यूपीएमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यामुळे यासाठी शरद पवार योग्य असल्याचे संजय राऊत म्हणाले.


तुमचा काय गाढव बाजार होता का?
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 6 लोकांची कोअर कमिटी स्थापन करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. जळगावात घोडेबाजार झाल्याचा आरोप भाजपने केलाय यावर तुम्हाला काय म्हणाचंय या प्रश्नावर पहाटेचा शपथविधी हा काय होता? गाढव बाजार होता का? असा टोला त्यांनी लगावला. 


महाराष्ट्रला अडचणीत सापडण्याची संधी केंद्र शोधतंय : राऊत
संजय राऊत सचिन वाझे प्रकरण आणि मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरणांवर बोलताना म्हणाले, की एनआयएला जो तपास करायचा आहे तो करु द्या. मुंबईचे पालीस, माहाराष्ट्राचे एटीएस सक्षम आहे. मात्र, केंद्रात विरोधी सरकार आहे. विरोधी पक्षांची वेगळीच भूमिका आहे. त्यामुळे ते राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, राज्यातील सरकारला काहीही फरक पडत नाही, असे राऊत म्हणाले. जगातील कोणतीही तपास यंत्रणा आणा जे सत्य आहे, तेच समोर येईल.