मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कोरोना विषाणूचं हॉटस्पॉट झालं आहे. दिवसेंदिवस मालेगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतचं चालली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मालेगावमधील रुग्णालये कमी पडू लागली आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी जवळच्या नाशिक किंवा धुळे शहरात नेण्यात येत आहे. मात्र, मालेगाव मधील कोरोना बाधित आणि अन्य रुग्णांना उपचारासाठी आणू नये, म्हणून नाशिक आणि धुळ्याच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. यामुळे मालेगावकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. लोकप्रतिनिधीनी केलेल्या या बेजबादार वक्तव्याच्या चौकशीची मागणी मालेगावकरांनी केली आहे.


मालेगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून रोजच नव्या रुग्णांची भर पडत आहे. पूर्वी कोरोना बाधित असलेल्या पुर्व भागाचे लोण काही दिवसांनी पश्चिम भागात सुध्दा पोहचल्याने संपुर्ण शहरच कोरोनाच्या सावटाखाली आलं आहे. याचा प्रचंड ताण सर्वच यंत्रणेवर पडतोय. मालेगावमधून अनेकजण नाशिकमध्ये जात असल्याच समोर आल्याने नाशिक मधील लोकप्रतिनिधींनी मालेगावमधून उपचारासाठी दाखल होणाऱ्यांना नाशिकमध्ये येण्यास विरोध करीत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. तर धुळ्याच्या खासदारांनी मालेगावच्या रुग्णांना धुळ्यात येण्यास विरोध दर्शविल्याने काल मालेगावकर विधायक संघर्ष समितीने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली.


राज्यात अडकलेल्या लोकांना गावी परतण्यासाठी एसटीची मोफत सेवा : अनिल परब


लोकप्रतिनिधींचा आडमुठी भूमिका
मालेगाव मधील नागरिकांनी संचारबंदी, सोशल डिस्टन्सचे पालन केले नाही, हे मान्य असले तरी कोरोनाचा कहर सर्वत्रच सुरु आहे. त्यामुळे मालेगावमध्ये वैद्यकिय सुविधा पुरेशा नसल्यामुळे पुढील उपचारासाठी अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना नाशिक येथे उपचारासाठी पाठवावेच लागते. त्यामुळे मालेगावच्या रुग्णांना नाशिकमध्ये उपचारासाठी आणू नये या नाशिक, धुळेच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकेचा अनेकांनी निषेध करत नाराजी व्यक्त केली आहे. एकुणच लोकप्रतिनीधींकडून अशा प्रकारची भूमिका घेतली जात असले तर मालेगावच्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधेसाठी कुठे जावे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागलाय.


मुंबईत पोलिसांवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, दोघे जखमी; मरिन ड्राईव्हवरील थरारक घटना


मालेगावमध्ये परिस्थिती गंभीर
मालेगावमध्ये परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वसामान्यांसोबत प्रशासनाचीही चिंता वाढत आहे. या ठिकाणी बंदोबस्तासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे.


Sanjay Raut UNCUT | विरोधी पक्षांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन राजकारण करु नये : खासदार संजय राऊत