नाशिक : महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवारांच्या नेतृत्त्वातील  राष्ट्रवादी  काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचा आज वाढदिवस आहे. नरहीर झिरवाळ यांनी नुकताच महाविकास आघाडीचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे (Sandip Gulwe) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वैयक्तिक कारणामुळं पाठिंबा जाहीर करत असल्याचं ते म्हणाले. दुसरीकडे अजित पवारांच्या (Ajit) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती आणि सोशल मीडियावरील पोस्टवर  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि  खासदार भास्कर भगरे , स्थानिक नेते श्रीराम शेटे यांचे फोटो असल्यानं खळबळ उडाली आहे.  नरहरी झिरवाळ यांनी हे बॅनर्स कार्यकर्त्यांनी लावले असल्याचं म्हणत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. 


विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे विविध कारणांमुळं चर्चेत असतात. आता नरहरी झिरवाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर शरद पवार आणि भास्कर भगरे यांचा फोटो कार्यकर्त्यांनी छापल्यानं खळबळ उडाली आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी  भास्कर भगरे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या एका बैठकीत नरहरी झिरवळ यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. त्यावरुन देखील राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.  



 
लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार असताना झिरवाळ यांचा आघाडीच्या उमेदवारा सोबतचा फोटो व्हायरल झाल्याने महायुतीत खळबळ उडाली होती. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे विजयी झाले होते. नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात देखील भास्कर भगरे यांनी आघाडी घेतली होती.


नरहरी झिरवाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्सवर शरद पवार आणि भास्कर भगरे यांचे फोटो असणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे.   वर्तमान पत्रातील जाहिराती आणि सोशल मीडियातील पोस्टवर शरद पवार , भास्कर भगरे आणि श्रीराम शेटे यांच्या फोटोमुळे झिरवाळ चर्चेत आले आहेत.  


नरहरी झिरवाळ यांचा मविआच्या संदीप गुळवेंना पाठिंबा


विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे मविआचे उमेदवार संदीप गुळवे यांनी नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली. यावेळी  संदीप गुळवे यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर देखील उपस्थित होते. नरहरी झिरवाळ यांनी संदीप गुळवे पाठिंबा दिल्यानं महायुतीत खळबळ उडाली आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेतर्फे किशोर दराडे रिंगणात आहेत. याशिवाय भाजप नेते विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून मतदार कुणाला कौल देणार याकडे  सर्वाचं  लक्ष लागलं आहे. नरहरी झिरवाळ यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भूमिका काय असणार हे पाहावं लागेल.  


संबंधित बातम्या:



अजित पवार गटाच्या पिंपरी विधानसभेवर आठवलेंच्या RPI सह भाजपचा डोळा; अण्णा बनसोडेंची गोची होणार?