Nashik: नाशिक शहरातील केटीएचएम महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट वैष्णवी चौधरी हिने दार्जीलिंग येथे झालेल्या ॲडव्हान्स पर्वतारोहण शिबिरात सहभाग घेतला. त्यानंतर खडतर प्रशिक्षण पूर्ण करत तिने उत्तर सिक्कीम मध्ये आणि समुद्रसपाटीपासून 17 हजार 500 फूट उंचीवर असलेल्या काब्रु डोम नावाच्या शिखरावर यशस्वी कढाई केली. या मोहिमेनंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व एनसीसी कॅडेट म्हणून प्रशिक्षणार्थी वैष्णवी चौधरीने ही खडतर मोहीम फत्ते केली आहे. वैष्णवीने हा आशियातील तिसरा सर्वात कठीण ट्रेक पूर्ण केला आहे. ट्रेक पूर्ण करून ती बेस्ट कॅम्पवर पोचली. या मोहिमेत सहभागी घेणाऱ्या 59 जणांच्या गिर्यारोहकांत ती एकमेव महिला एनसीसी कॅडेट होती.
दरम्यान हिमालय पर्वतारोहण संस्था ही पर्वत शिबिरासाठी सर्वात जुनी संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेकडून दरवर्षी सुमारे 12 हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये मार्कोस, पॅरा कमांडो, एनसीसी मुले आणि मुली आणि नागरिकांचा समावेश आहे. यंदाच्या बेस कॅम्पमधील या कोर्समध्ये एकूण 59 जणांची संख्या होती. त्यापैकी एकमेव वैष्णवी ही मुलगी एनसीसी कॅडेट होती. जीने काब्रु डोम शिखर यशस्वीरित्या पार केले.
वैष्णवी चौधरी हिने ही मोहीम पार केल्यानंतर नाशिकमधून तिचे कौतुक होत आहे. या खडतर प्रशिक्षणासाठी तिला मुंबई बी ग्रुपचे ग्रुप कमांडर ग्रुप कॅप्टन निलेश देखने, कर्नल समीर सिंग राणावत, कॅप्टन शैला मेंगाने व तिचे पालक अनिल चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही बी गायकवाड यांनी वैष्णवीचे कौतुक केले.
मोहिमेत एकमेव महिला कॅडेट
जूनमध्ये पहेलगाम येथे झालेल्या बेसिक व पर्वतारोहण शिबिरामध्ये ए ग्रेड मिळाल्यामुळे वैष्णवीची हिमालय पर्वतारोहण संस्थेतर्फे दार्जिलिंग येथे 28 दिवसांचे ऍडव्हान्स प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. पहिला एक आठवडा शारीरिक चाचणी, अडथळ्यांचे मूलभूत प्रशिक्षण तसेच चढाईचे तंत्र तिने अवगत केले. आपत्कालीन परिस्थिती स्ट्रेचर कसा बनवायचा आहे? हे शिकवण्यात आले. सात दिवसांच्या अखंड प्रशिक्षणानंतर कॅडेटला ग्लेशियर मध्ये वैष्णवी सह सहभागी प्रशिक्षणार्थींना हलवण्यात आले. या मोहिमेत ती एकमेव महिला कॅडेट होती, हे विशेष.
अशी फत्ते झाली मोहीम
दरम्यान ग्लेशियरला जाण्यासाठी त्यांना 24 किमी ट्रेकिंग मार्ग पार करावा लागतो. हा आशियातील तिसरा सर्वात कठीण ट्रेक आहे. आणि ती यशस्वीपणे ट्रेक पूर्ण करून बेस कॅम्पवर पोहोचली. तिने सात दिवसांचे हिमनदीचे प्रशिक्षण घेतले आणि शेवटचा दिवस सबमिट करण्याचा दिवस होता. जिथे त्यांनी उत्तर सिक्कीम मध्ये आणि समुद्रसपाटीपासून जवळपास 17 हजार पाचशे फूट उंचीवर असलेल्या कामृम नावाचे शिखर पार केले.