Nashik News Update : राष्ट्रगीत सुरू असतानाच माजी सैनिकाचा (Ex Serviceman) मृत्यू झालाय. चंद्रभान मालुंजकर असे मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात राष्ट्रगीत सुरू असताना मालुंजकर जमिनीवर कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


देशभरात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने नाशिक शहरातील सातपूर परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात येत होती. राष्ट्रगीतासाठी सर्व मान्यवर उभे होते. राष्ट्रगीत सुरू असताना अचानक उपस्थित माजी सैनिक जमिनीवर कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. 


सातपूर सातपूर परिसरातील संदीप नगरे येथील खासगी शाळेत 'आजादी का अमृत महोत्सव' निमित्त आयोजित कार्यक्रमात माजी सैनिक चंद्रकांत मालुंजकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. राष्ट्रगीत सुरू असतानाच मालुंजकर यांना अस्वस्थ वाटू लागले. राष्ट्रगीत संपताच ते चक्कर येऊन पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णाला दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मालुंजकर हे 1962 च्या युद्धात सहभागी होते.  


स्टेजवरकच मृत्यू 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी   प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी राष्ट्रगीत सुरू असताना स्टेजवर उभे असलेल्या चंद्रकांत मालुंजकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते स्टेजवरच कोसळले. यातच त्यांचे निधन झाले.  


निवृत्तीनंतर अनेक उपक्रम
चंद्रभान मालुंजकर यांनी निवृत्तीनंतर सातपूर परिसरात माजी सैनिक संघटनांच्या माध्यमातून नव तरुणांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. परिसरातील कोणत्याही कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती असायची. मांजुलकर यांच्या मृत्यूमुळे नाशिक जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या मृ्त्यूने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. चंद्रभान मालुंजकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 


महत्वाच्या बातम्या


Azadi Ka Amrit Mahotsav : चिमुकल्यांनी चित्रांद्वारे समजून घेतले 'चाले जाव', जंगल सत्याग्रह, गोवा मुक्ती संग्राम 


मंकीपॉक्सच्या उद्रेकाविरोधात लढण्यासाठी अमेरिकेची Siga IV औषधांची खरेदी, इंजेक्शनवाटे मिळणार औषध 

Maharashtra Rains Update : 24 तासात राज्यात अनेक भागात अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी, लांजा तालुक्यात सर्वाधिक पाऊस