नाशिक : कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या वाढू लागल्याने नाशिक महानगरपालिका अॅक्शन मोडमध्ये आली आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह शहरातील 6 डॉक्टर आणि एका क्लिनिकवर साथरोग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अनेक महिन्यांनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने महापालिका धडक कारवाई सुरू केली आहे.


शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत. उपदेशाचे डोस पाजले जात आहेत, येवढं करूनही कोणी एकले नाही तर दंडात्मक कारवाई केली जात आहे, गेल्या दोन तीन दिवसात कारवाईला जोर चढला असून बस स्थानक, बाजारपेठत जाऊन बेजबाबदार, बेफिकीर नागरिकांवर करावाई केली जात आहे. यात सरकारी कर्मचारी, एसटी महामंडळचे चालक वाहकही सुटलेले नाहीत.


मनपाचे कर्मचारी केवळ रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवरचं कारवाई करत नाहीये तर डॉक्टर, क्लिनिकही या करवाईतून सुटलेले नाहीत. हॉटेलमध्ये सेमिनारसाठी आलेल्या डोक्टर्सने मास्क घालतलेले नसल्यानं 6 डोक्टर्सला दंड ठोठावण्यात आला आहे. क्लिनिकमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही, रुग्णांच्या चेहऱ्याला मास्क नसल्यानं 5 हजार रुपयांचा दंड ठोठाण्यात आला आहे.


नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना वाढला
गेल्या काही दिवसांत शहरासह जिल्ह्यातील रुग्णाची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत नाशिक शहरात 215 तर जिल्ह्यात 355 रुग्ण आढळून आलेत. जवळपास दीड महिन्याने हा आकडा गाठला आहे, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. नाहीतर पुन्हा एकदा मार्च 2020 सारख्या लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.