मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक, नाशिक विभागाच्या पथकाने मुंबई- आग्रा माहामार्गावर सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेले तसेच गोवा राज्यात निर्मीत व गोवा राज्यातच विक्री करता असलेला  विदेशी मद्याचा ट्रक पकडून त्याच्यावर कारवाई केली. 


राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या पथकाला अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने ओझर जवळील मुंबई आग्रा महामार्गावरील कारभारी हॉटेल समोर, दहावा मेल, ओझर येथे सापळा रचला. यावेळी या मार्गावरून सहाचाकी ट्रक (एम एच -43-वाय -9251) संशयास्पदरित्या जात असता त्याला अडवून तपासणी करण्यात आली. 


दरम्यान तपासणी केली असता ट्रकमध्ये 5 हजार 400 लिटर  महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेले तसेच गोवा राज्यात निर्मीत व गोवा राज्यातच विक्रीकरता असलेला  विदेशी मद्यसाठा आढळून आला.  पथकाने लागलीच हा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला मुद्देमाल हा 53 लाख 88 हजार रुपयांचा असून संशयित बबलू हरभजन यादव यास अटक करण्यात आली आहे. 


या कारवाई करीता निरीक्षक कळवण विभाग  एस. के. सहस्त्रबुध्दे, दुय्यम निरीक्षक आर. एम. डमरे व त्यांचे पथक  तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.03.  एम. एम. कावळे व त्यांचे पथक  यांनी यशस्वीरित्या पार पडली. याप्रकरणी पुढील तपास  दुय्यम निरीक्षक, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग ए. जी. सराफ करीत आहेत.


राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे आवाहन 
 
अवैध मद्य निर्माती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र. 18008333333 व व्हॉटस अॅप क्र. 8422001133 तसेच दुरध्वनी क्र. 0253/2319744  वर संपर्क साधावा.


संबंधित बातम्या :



Nashik Crime : धक्कादायक! नाशिकच्या माडसांगवीत 363 क्‍विंटल अनधिकृत धान्यसाठा जप्त, तहसीलदारांकडून गोदाम सील