Nashik News : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लसीकरण मात्र सुरूच आहे. आता हर घर दस्तक या मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास दीड लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. 


नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती निवळली असली तरी लसीकरण मात्र अद्यापही सुरु आहे. कोरोनासोबत पावसाळ्यात येणाऱ्या जलजन्य आजारांचे आव्हान महापालिकेसमोर असून हर घर दस्तक सारख्या अभियानातून सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना महाराष्ट्र कोविड टास फोर्सने केली आहे. तसेच प्रत्येक नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून मास्कचा नियमित वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तर ज्या नागरिकांनी अद्याप एकही डोस घेतला नाही किंवा कोणताही दुसरा डोस राहिला असेल त्यांनाही घरी जाऊन लस यांच्या सूचना नुकत्याच देण्यात आले आहेत. 


दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरणाला वेग आला आहे.कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी पुढील दोन आठवडे कोरोना परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी बाधित रुग्ण शोधून काढणे हे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवली जात आहे. त्याप्रमाणे हर घर दस्तकच्या माध्यमातून लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत आहे. 


घरोघरी जाऊन लसीकरण
तसेच नागरिकांच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार आपल्या पथकामार्फत घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढण्यासही मदत होत आहे. ज्यांचे लसीकरण राहिले आहे, त्यांनी अवश्य या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले असून यासाठी जिल्ह्यात सध्या लसीकरणासाठी 1350 जणांचा चमू कार्यरत आहेत. घरी लस देण्याची मागणी करणाऱ्यांपैकी आत्तापर्यंत 01 लाख 63 हजार 786 नागरिकांना घरी जाऊन लस देण्यात आले आहे. 


पहिला डोस ९० टक्क्यांवर 
नाशिक जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 90 टक्क्यांवर पोहचले असून मालेगाव वगळता बहुतांशी तालुके 90 टक्‍क्‍यांच्या जवळ आहेत तर दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण 79 टक्के असूनजिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांनी तसेच फ्रंटवर्करनी बूस्टर डोस घ्यावा यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात असताना आतापर्यंत जवळपास एक लाख 61 हजार 909 जणांनी बूस्टर डोस घेतला आहे.