नाशिक : दुचाकी चालविताना व्हिडीओ काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतले असून दुचाकी अपघातात (Accident) एका युवकाला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकच्या गंगापूर - गिरणारे रोडवर हा भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून गिरणारेकडे जात असताना गंगापूर गावच्या पुढे वळणावर समोरून काही युवक दुचाकीवर येत होते. यातील एक जण दुचाकी चालविताना व्हिडीओ काढत होता. व्हिडीओ (Video) काढत असतांना तो रस्त्याच्या त्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या दुचाकीवर (Two Wheeler Accident) जाऊन धडकला.
दरम्यान या अपघातात समोरून येणाऱ्या दुचाकीवरील युवक रस्त्यावर फेकला गेला. रक्तश्राव अधिक झाल्याने सदर युवक जागीच गतप्राण झाला. मयत युवक हा सुतारपाडा (गुजरात) येथील असल्याचे समजते. मात्र नाव समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच नाशिक तालुका पोलिस घटनास्थळी पोहचले. सध्या गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून चालत्या दुचाकीवर व्हिडिओ काढणे किती महाग पडू शकते , याची प्रचिती या अपघातावरून दिसून येते.
अपघात वाढले!
एकीकडे शहरी भागात रस्ते चकाचक होत असताना दुसरीकडे अपघातांची संख्याही वाढली आहे. रोज अपघाताच्या दोन ते तीन घटना समोर येत आहेत. त्यातच दुचाकीवर स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. अशावेळी गाडी कंट्रोल न झाल्यास हकनाक जीव जाण्याचा धोका असतो. तसेच इतरांनाही यामुळे अपघाताला सामोरे जाण्याची भीती असते.
संबंधित बातम्या :
Sangli Accident News : एकाच मोटरसायकलवर चार मित्र सवार; अपघातात तिघे गतप्राण; एक गंभीर जखमी