नाशिक : नायलॉन दोरीचा फास बसल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते गावात घडली. झोका खेळत असताना फास लागून उमेश कुवर या मुलाचा मृत्यू झाला.
रविवारी (आज) दुपारी 3 वाजेच्या सुमारास घरात लहान बाळासाठी बांधलेल्या नायलॉन दोरीच्या झोक्यावर उमेश झोके घेत खेळत होता. मात्र अचानक झोके घेत असतानाच त्याला दोरीचा फास बसला आणि तो गंभीर जखमी झाला.
हे बघताच उमेशच्या चुलत भावाने त्याला तात्काळ नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवल. मात्र, उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याने प्राण सोडला. या घटनेनंतर कुवर कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हर्सुल पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारे अपघातांमध्ये चिमुकल्यांचा जीव जाण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
नायलॉन दोरीचा फास लागून नाशकात 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
04 Mar 2018 10:42 PM (IST)
घरात लहान बाळासाठी बांधलेल्या नायलॉन दोरीच्या झोक्यावर उमेश झोके घेत खेळत होता. मात्र अचानक झोके घेत असतानाच त्याला दोरीचा फास बसला आणि तो गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -