नाशिक : दोन दिवसापासून कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी गतवर्षीच्या तुलनेत मृत्यूदर वाढला आहे. कोरोनाच्या महामारीत आपण चांगली माणसे गमावली असून ही महामारी रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कठोर भुमीका, कारवाई आणि अंमलबजावणी केल्याशिवाय कोरोना नियंत्रणात येणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील संशयित आणि बाधित रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरणास विरोध केल्यास थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
मालेगावात सुरुवातील कोरोनाच्या हॉटस्पॉट असलेल्या 38 गावांची संख्या कमी होऊन आज 19 वर आल्याचे सांगत या 19 गावातील ज्या ग्रामदक्षता समित्या आहेत त्यातील तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी विशेष परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. या गावातील संशयित रुग्ण गावभर फिरणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच बाधित रुग्णाच्या घराची प्रत्यक्ष पडताळणी करून गरजेनुसार त्यास संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. त्याने विरोध केल्यास त्यास थेट मालेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे. अशा रुग्णांकडून विलगीकरणासाठी प्रतिसाद न मिळाल्यास थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तर ग्रामीण भागापेक्षा शहरात लसीकरण कमी होत असल्याबद्दल अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम
राज्यात 30 एप्रिल पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. 1 मे नंतर पुढील 15 दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला तर फायदा होऊ शकतो, असा तज्ञांनी सल्ला दिला आहे.
Covid 19 Vaccination Free : महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होते आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं.