नाशिक : निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्महगिरी पर्वताला आता सीमांकनाचे कोंदण लाभणार असून मानवी हस्तेक्षेपपासून पर्वतराज सुरक्षित राहणार आहे. पर्वताच पावित्र, सौंदर्य आणि जैवविविधता अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. पर्वताचे संरक्षणसाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्याची जिल्हयातील ही पहिलीच घटना आहे. 

Continues below advertisement

ब्रह्मगिरी पर्वतापसून टास्क फोर्सचे काम सुरू होणार असून जिल्ह्यातील गड किल्ले, जंगल डोंगररांगा यांचेही संवर्धन आणि सीमांकन केले जाणार आहे. ब्रह्मगिरी पर्वत परिसरात अवैध पद्धतीने उत्खनन सुरू असल्याचं वृत्त  एबीपी माझानं प्रसारित केले होत त्या वृताची दखल घेऊन प्रशासनाने टास्क फोर्स निर्मितीचा निर्णय घेतलाय.

बार ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे त्र्यंबकेश्वर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दर बारा वर्षांनी इथं कुंभमेळा भरत असल्यान जागतिक तीर्थस्थळांच्या यादीत तपोभूमीचं स्थान आहे. जेवढं या तपोभूमीचं धार्मिक महत्व तेवढंच इथलं निसर्ग सौंदर्य अधिक असल्यानं पर्यटनसाठीही देशविदेशातील पर्यटक येत असतात. ज्या पर्वतराजमुळे या नगरीचे धार्मिक महत्व वाढले त्या ब्रह्मगिरी पर्वतालाच ओरबडण्याच काम सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. 

Continues below advertisement

Shivaji Park : शिवाजी पार्कमध्ये पाण्याचा गोडवा, गोड्या पाण्याचे पाच स्रोत सापडले : स्पेशल रिपोर्ट

वर्षानुवर्ष ऊन- पाऊस, वादळ-वाऱ्यासाह इतर आव्हानांचा सामना करत आणि या संकटापासून त्र्यंबकंनगरीचे सरक्षण करणारा ब्रह्महगिरी पर्वत अनेक एतिहासिक पौराणिक घटनांचा साक्षीदार आहे. त्यामुळे हा इतिहासलाच धक्का मनाला जात आहे. दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी याच पर्वतावरून उगम पावते. सह्याद्री पर्वत रांगेतील ब्रह्महगिरी हा महत्वाचा पर्वत म्हणून ओळखला जात असल्यान पर्वतराज असे संबोधिले जाते.  मात्र या पर्वताच्या अस्तित्वालाच आता हानी पोचवली जात असून निसर्गिक साधन संपत्ती, पर्यावरण, जैव विविधतेला धोका निर्माण झाला आहे. 

पोकलन, जेसीबी सारख्या अजस्त्र मशिनरीच्या सहायाने काही महिन्यांपासून दिवसा ढवळ्या इथं उत्खनन केल जात आहे. उत्खननाची परवानगी नसतानाही बेकायदेशीरपणे उत्खनन करण्यात आले. स्थानिक प्रशसाकीय कर्मचाऱ्यांनी उत्खननाकडे दुर्लक्ष केलं, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना  याबाबतची कानोकान खबर नव्हती. याबाबत माध्यमांनी वृत्त प्रसारित करताच प्रशसाकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि इथं सुरु असणाऱ्या या कामाची चौकशी सुरू झाली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या तलाठी कोतवाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून उत्खनन करणाऱ्या व्यवसायिकाला तब्बल एक कोटी 52 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्र्यंबकेशवर पोलीस ठाण्यात सरकारी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सदर प्रकरणी कचाट्यात सापडलेल्यांच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या संदर्भात पुढकार घेऊन जातीने लक्ष घालत कठोर करवाईचे आदेश दिले आहेत. 

ब्रह्मगिरी पर्वत गोदावरी नदीचे उगमस्थान आहे.  केवळ नाशिक महराष्ट्रच नाहीतर कर्नाटक, ओदिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश या सहा राज्यातून वाहताना संपूर्ण परिसर गोदामाई ने सुजलाम सुफलाम केला आहे.  त्यामुळे ब्रह्मगिरी पर्वताला वाचविण्यासाठी सहाही राज्यातून सेव्ह ब्रम्हगिरी मोहीम सुरू झालीय. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह या मोहिमेच नेतृत्व करत आहेत. ब्रह्मगिरी आणि त्र्यंबकेश्वरच्या वातावरणाची भुरळ पडल्यान पर्वताचा आजूबाजूला अनेक फार्म हाऊससह छोटेमोठे बांधकाम प्रकल्प सुरू झाले आहेत. या बांधकामामुळे पर्यावरणाचा ह्रास होत असल्याचा पर्यावरण प्रेमीचा आरोप आहे.  हा पर्वत ईको सेनसीटिव्ह झोन जाहीर करा अशी मागणी पर्यावरण प्रेमिनी केली असून पर्वतराजाला वचिवण्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या साक्षीने शपथ घेण्यात आली आहे. त्यामुळे हा लढा किती यसशवी होतो ही बघण महत्वचे आहे.