मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. नाशिकमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे, त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने नाशकात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. व्यापारी, दुकाने यांना सवलत देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सलून, कपड्याचे दुकाने, सराफ व्यवसायकांचे दुकानं उद्यापासून सुरू होणार आहेत. 


नाशिमध्ये निर्बंधांमध्ये काय सवलत देण्यात आलीय?



  • आस्थापना दुकाने सकाळी 7 ते 2 या वेळेत सुरू राहणार. 

  • भाजीपाला विक्री 7 ते 2 या वेळेत सुरू राहणार.

  • शिवभोजन 10 ते 2 पार्सल सेवा सुरू राहणार.

  • अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांनाच परवानगी.

  • दुपारी 3 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी बंदी लागू राहणार 

  • अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर पडण्यासाठी परवानगी नाही.

  • शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू राहतील.

  • बँक सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार.

  • 15 जूनपर्यंत निर्बंध लागू राहणार.

  • सलून, कपड्याचे दुकाने, सराफ व्यावसायिकांची दुकानं उद्यापासून सुरू होणार.