मालेगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभरात लोकडाऊन करण्यात आलंय. मोठं मोठ्या कंपन्यानी देशहितासाठी आपल्या इंडस्ट्रीला टाळ ठोकलंय. मात्र, मालेगावच्या पॉवर लूम चालक या संकट काळातही आपली मनमानी करत असून सरकारी आदेश पायदळी तुडवून सूत गिरणी राजरोसपणे सुरू ठेवत असल्याचं उघडकीस आलाय. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उप निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
मालेगाव हे कायमच संवेदनशीलशहर म्हणून ओळखले जाते. मात्र, देशावर आलेल्या आपत्तीच्या काळात तरी नियम कायदे पळाले जातील अशी अपेक्षा होती. मात्र, तीही धुळीला मिळाली आहे. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उप निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूत गिरणी सुरू असताना कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक सूरज आगे आणि त्यांच्या सहकार्यांशी सूत गिरिणीतील कामगारांनी हुज्जत घातली. त्यावेळी सौम्य बळाचा वापर करून सूत गिरणी बंद करण्यास भाग पाडल्यानंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कामगीरीवर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडेच खुलासा मागत करवाईचा बडगा उगारला आहे.
coronavirus | पुण्यात 24 तासात कोरोनाचे तीन बळी, मृतांची संख्या पाचवर
कृषिमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यातील धक्कादायक प्रकार
पोलीस उपनिरीक्षक सुरज आगे यांची तात्पुरती रमजानपुरा पोलीस ठाण्यातून कॅम्प पोलीस ठाण्यात बदली करण्यात आलीय. मालेगांवचे आमदार मौलाना मुफ्ती यांच्या समर्थकांचा पॉवर लूम असल्यानं कारवाई होत असल्याची पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे, विशेष म्हणजे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यातील धक्कादायक वास्तव्य समोर येत असताना त्यांच्यांकडून ही कुठलीच कारवाई झालेली नाही. या संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस अधिकारी कर्मचारी काम करत असताना लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे मनोबल वाढविण्या ऐवजी खच्चीकरण केले जात असल्यानं भविष्यात कारवाईला कोणी पुढे जाणार का? असा प्रश्न दबक्या आवाजात उपस्थित केला जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरवून गैरसमज पसरविला जात असताना त्यावर मात्र कुठलीच कारवाई नाही.
Coronavirus | कोल्हापुरातील नागरिकांकडून चीनी वस्तूवर बहिष्कार