पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाबाधित तीन रूग्णांचा  मृत्यू झाला आहे. यामध्ये एका 60 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा तर 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. पुरुषाचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. त्याचा कोरोना अहवाल रात्री उशिरा आला असून त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.


एका 69 वर्षीय महिलेला पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे गुलटेकडी येथील अडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये 30 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. परंतु या रुग्णालयात उपचार न करता तिला औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी (5 मार्च) सकाळी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.










तर ससून रुग्णालयातच शनिवारी (4 मार्च) 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. डायबेटीस आणि हायपरटेन्शनमुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


संपूर्ण देशावर कोरोना व्हायरसचं सावट असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रात जास्त दिसून येत आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 690 आहे.


संबंधित बातम्या :