Nashik News : नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरून (Saptshrungi gad) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सप्तश्रृंगी गडाच्या शीतकड्यावरून उडी मारून प्रेमी युगुलाने जीवन संपवले. प्रेमीयुगुलाने 400 फूट खोल दरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. हे तरुण-तरुणी गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता होते. प्रियांका संतोष तिडके (Priyanka Tidke), मंगेश राजाराम शिंदे (Mangesh Shinde) अशी आत्महत्या केलेल्या तरुण-तरुणीचे नावे आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तरुण 24 वर्षे आणि तरुणी 16 वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. 28 एप्रिलला तरुण-तरुणी दुचाकीवरून सप्तश्रृंगी गडावर आले होते. दोघांनी सप्तश्रृंगी गडावर शीतकडा येथून उडी मारून आत्महत्या केली होती.
कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
यानंतर आठवड्याभराने प्रेमीयुगुलाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. गडाच्या पायथ्याला असणाऱ्या भातोडे येथील गुराख्यांनी याची माहिती पोलीस पाटील विजय चव्हाण यांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले. याबाबत कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिलीय की नाही याची माहिती समजू शकलेली नाही. दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर त्यांच्याजवळ असलेल्या साहित्यावरून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या